Side Menu Packages of Practice

गहू

प्रस्‍तावना

गहू एक महत्त्वपूर्ण रबी धान्य आहे, ज्याची भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के भागीदारी आहे. यद्यपि येथे अनेक जाति आहेत

जमीन

गहू पिकासाठी चांगल्या निच-याची भारी आणि खोल जमिनीची निवड करा. हलक्या व मध्यम जमिनीत भरपूर भरखते घालणे आवश्यक आहे. जिरायत गहू ओलावा टिकवून धरणा-या भारी जमिनीतच घ्यावा.

पेरणीची वेळ – जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.

पेरणी

  • पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नका.
  • उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.
  • जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ३.० मीटर रूंदीचे सारे पाडावेत व आडव्या दिशेने पाट पाडावेत.
  • बियाणे – गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी २० ते २२ लक्ष झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.
  • उशीरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे आणि पेरणी १८ सें.मी. अंतरावर करावी.
  • जिरायत गव्हासाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे वापरावे व २२.५ सें.मी. अंतरावर पेरणी करावी.

गव्हाचे सुधारित वाण

अ.क्र. जात फुलावर येण्याचा कालावधी (दिवस) परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस) १००० दाण्याचे वजन (ग्रँम) दाण्याचा रंग प्रती हेक्टरी उत्पादन
अ) कोरडवाहू
१. एन ५९ ५५-६० ११५-१२० ४०-५४ पिवळसर ८-१०
२. एमएसीएस १९६७ ५५-६० १०५-११० ४२-४५ पिवळसर ८-१०
३. एन आय ४५३९ ५५-६० १०५-११० ३५-३८ पिवळसर १०-१२
४. एकेडीडब्लू २९९७-१६(शरद) ५०-६० ११०-११५ ४५-५५ पिवळसर १२-१४
ब) बागायती वेळेवर पेरणी
१. एचडी २३८० ५५-६० १०५-११० ३८-४० पिवळसर ३०-३५
२. एमएसीएस २४९६ ६०-६५ ११०-११५ ३८-४० पिवळसर ३०-३५
३. एचडी २१८९ ६०-६५ ११०-११५ ४०-४२ पिवळसर ३०-३५
४. पूर्णा (एकेडब्लू १०७९) ६५-७० ११०-११५ ४०-४२ पिवळसर ३०-३५
५. एमएसीएस२८४६ ६५-७० ११०-११५ ४५-५० पिवळसर ३०-३५
६.. एकेएडब्ल्यू ३७२२ (विमल) ५०-६० १०५-११५ ४०-४२ पिवळसर ३०-३५
क) बागायती उशिरा पेरणी
१. एकेडब्ल्यू ३८१ ५५-६० ९०-९५ ४४-४६   २५-३०
२. एच आय ९९९ ५५-६० १००-१०५ ४०-४२   २५-३०
३. एचडी २५०१ ५५-६० १०५-११० ४०-४२   २५-३०
४. पूर्णा (एकेडब्ल्यू १०७१) ५५-६० १००-१०५ ४०-४२   २५-३०
५. एनआयएडब्ल्यू ३४ ५५-६० १००-१०५ ४०-४२   २५-३०

टिप: गव्हाच्या कल्याण सोना, सोनालीका आणि लोक  वन या जाती तांबेरा रोगास बळी पडत असल्यामुळे त्याची लागवड करु नये

आंतरमशागत

  • पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणाचे प्रमाण लक्षात घेवून एक किवा दोन वेळा निंदण करावे. रूंद पानी तणांच्या बंदोबस्तासाठी २,४- डी (सोडीयम साल्ट) या तणनाशकाची प्रती
  • हेक्टरी १ किलो क्रियाशील मूलद्रव्य ५०० लीटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. ही फवारणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी करावी.

खते

  • हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे.
  • बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.
  • उशीरा पेरणीसाठी हेक्टरी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश ही खते वरीलप्रमाणेच दोन हप्त्यात द्यावे.
  • जिरायत गव्हास पेरणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश द्यावे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.

पाणी व्यवस्थापन

बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी-जास्त असू शकतात. पाण्याचा साठा एकच पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी पाणी द्यावे. पाण्याचा साठा दोन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. पाण्याचा साठा तीन पाणी देण्याइतका उपलब्ध असेल, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. तथापि, गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत, त्या वेळी पिकास पाणी देणे फायद्याचे आहे. त्याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे

पीकवाढीची अवस्था पेरणीनंतरचे दिवस

  • मुकुटमुळे फुटण्याची वेळ 18 ते 21
  • कांडी धरण्याची वेळ 40 ते 45
  • पीक ओंबीवर येण्याची वेळ 60 ते 65
  • दाण्यात चीक भरण्याची वेळ 80 ते 85

गव्हावरील किडीचे एकिकृत व्यवस्थापण

महाराष्ट्रात गव्हाची लागवड दोन प्रकारे करण्यात येते. जिरायत पध्दत व बागायत पध्दत म्हणुन . गहु आपल्या भागातील रबी हंगामातील एक महत्वाचे अन्नधन्याचे पिकआहे. या पिकावर अनेक किडीची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या विभागात यापिकावर मुख्यतःखोड किडी, तुडतुडे, मावा, वाळवी इत्यादीव प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो. त्याची व्यवस्थापनाबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.

खोडकिडा: Sesamia inferens Walker (Noctuidae : Lepidoptera)

या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे व गवती रंगाचे असतात. पुर्ण वाढ झालेली अळी सुमारे २-३ से.मि असुन तिचा रंग गुलाबी असते. ती अंगाने मु आणि डोके काळे असते. या किडीचच्या प्रादुर्भावाने वाढणारा मधला भाग सुकुन जातो. अी खोडात शिरुन खालीलस भागवर उपजिवीका करते. त्यामुळे रोपे सुकुन जातात. व त्यांना ओंब्या येत नाही.

या किडीचे नियंत्रणासाठी  उभ्या पिकातील कीडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने २-३ वेळा मुळासकट उपटून नाश करावा. तसेच पिकाखाली फवारणी झाल्यावर उपद्रवग्रस्त शेतातील धसकटे एकत्र करुन जाळावित. उभ्या पिकात पिक पोटरीवर येण्याचे सुमारास हेक्टरी २ किलो कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवाराणी करावी.

तुडतुडे

हे किटक आकारने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांचा रंग हिरवट राखडी असतो. तुडतुडे व त्यांची पिल्ले पानातुन रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन ती वाळु लागतात व पिकांची वाढ खुंटते. या किडीचे नियंत्रणासाठी (प्रादुर्भाव दिसुन आल्यावर) डायमेखोएट ३० टक्के प्रवाही ३०० मिली. किंवा मिथाईल डिमेटाईल २५ टक्के प्रवाही ४०० मिलि किंवा पेन्थीऑन ५० टक्के २०० मिलि. किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी १ किंलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा कार्बारील १० टक्के भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात विरघळवावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी/ धुरळणी १५ दिवसानी वरीलप्रमाणे करावी.

मावा Aphid : Aphis maidis Fab.

गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसुन येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुस-याचा रंग हिरवा असते. हेकिटक लाब व वर्तुळाकार असते या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातुन व कोवळ्या शेंड्यातुन रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातुन मधासाखा गोडव चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते.या किडीचे नियंत्रण तुडतुड्या प्रमाणे करावे.

वाळवी किंवा उधई- Termite: Microtermes obesi (Termitidae: Isoptera)

ही कीड सर्वांच्या परिचयाची आहे व या किडीचा प्रादुर्भाव पिक वाढीच्या अवस्थेत दिसुन येतो. ही कीड गव्हाच्या रोपाची मुळे खाते. व त्यामुळे रोपे वाळतात. व व सपुर्ण झाड मरते. वाळवाचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावित. व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट केल्यानंतर मध्यभागी सुमारे ३० से.मि. खोलवर एक छिद्र करावेत. आणि त्यात क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही हे किटकनाशक १५ मिलि. १० लिटर पाण्यात मिसळुन वारुळात वापरावे. वरील औषधाचे मिश्रन ५० लिटर एका वारुळासाठी पुरेसे होते. किंवा क्विनडलफॉस ५ दजाणेदार किंवा फोरेट १० टक्के दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ % दाणेदार हेक्टरी २५ किलो जमिनीत टाकावे. आथवा शेनखताबरोबर द्यावे.

उंदीर

उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खातात आणि बिळात साठवितात. उंदीरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरड ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग झिंक फॉस्फाईड किंवा ब्रोमाडिऑलान एकत्र मिसळावे. चमचाभर (आंदाजे १० ग्रॅम) विषारी आमिष प्लॅस्टिकच्या पिशवित टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे.

रोग व त्यांचे व्यवस्थापन

1) तांबेरा:

हा हवेव्दारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानांवर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोडे येतात, जे पुढे काळे पडतात. या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात. तांबे-यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक वानांचा वापर करावा.(उदा. एचडी २१८९, पूर्णा, एकेडब्ल्यू ३८१ व एचआय ९७७)

तांबे-याची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम ४५) हे बुरशीनाशक २५ ग्रॅम, १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेउन  १० ते १५ दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात.

२)काजळी किंवा काणीः

या रोगाचा प्रसार बियाण्याव्दारे होते. रोगाट ओंब्यामध्ये दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची २.५ ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.

३)पानावरील करपाः

गव्हावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाचे प्रादुर्भाव दिसताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक २५ ग्रॅम + १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.