किसान एस एम एस

(www.mkisan.gov.in)

कृषि विस्ताराखालील NeGPA अंतर्गत एम किसान पोर्टलवर शेतकरीनिहाय मोबाईल क्रमांक व घेतली जाणारी पिके /पूरक उद्योगाची माहिती संकलित असून त्याआधारे शेतकऱ्यांना कृषि व संलग्न क्षेत्राची उदा. शेती व पिक पध्दती, निविष्ठा, पर्जन्यमान व हवामान स्थिती, बाजारभाव, पशुधन, मत्स्यपालन इ. माहिती त्यांच्या मातृभाषेत माहिती/सेवा/सल्ला स्वरुपात एसएमएसद्वारे देण्यात येते.

कृषि व सहकार विभागांतार्गत एमकिसान पोर्टल संकल्पना विकसीत करण्यात आली असून, मोबाईल तंत्रज्ञानाच्या वापराने जसे एसएमएस, USSD आणि मोबाईल अॅपस यामुळे शास्त्रज्ञ तज्ज्ञ आणि सरकारी अधिकारी यांना माहिती पाठविणे, सल्ला देणे तालुका स्तरापर्यत सोपे झाले तसेच शेतक-यांना सल्ला पाठविणे मोबाईलमुळेच शक्य झाले.

एम किसान पोर्टलवर मोबाईलधारक शेतकऱ्यांची संख्या, पाठविलेले सल्ले व एसएमएसची संख्या या कार्यवाहीत महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर आहे.