पाण्यात बुडणारे खोदतळे
जलप्रवाहातील वाहते पाणी अडवून ते जमिनीत जिरण्यास वाव करुन द्यावा.यासाठी विकसित केलेले भूमिगत बंधारे व पुनर्भरण चर यांच्या प्रमाणेच खोदतळे हे देखील जल संधारणाचे एक तंत्र आहे. पावसाचे पडणारे पाणी भूपृष्ठीय पाणलोटातून नंतर नदीनाल्यात मिळून वहात असते. प्रवाह तळाच्या उतारामुळे ते वेगाने वाहत जावून शेवटी नैसर्गिक प्रवाहास व नंतर सागरास मिळते. हे वाया जाणारे पाणी जर त्यास अटकाव करुन त्याचा वेग कमी केला व काही काळपर्यन्त ते साठवून ठेवले तर, ते जमिनीत जास्तीत जास्त जिरेल व त्यायोगे भूमीजलाचे पुनर्भरण होईल हा विचार या तंत्रज्ञानामागे आहे. असे हे खोदतळे नालापात्रात तयार केले जाते.
खोद तळयाच्या जागेची निवड करतांना ज्या ठिकाणी नाल्याचे पात्र व प्रवाह सरळ रेषेत आहे, अशी जागा निवडन खोदतळाचे खोदकाम केले जाते. नालापात्रात किती खोलीवर पक्का खडक लागतो त्यानुसार 2 ते 3 मी. खोदतळयाची खोलीवर ठेवण्यात येते. नाला प्रवाहाच्या दिशेने खोद तळयाच्या वर बाजूस कमीत कमी 3:1 व खालच्या बाजूला कमीत कमी 5:1, 4:1 व खालच्या बाजूला 6:1 व 10:1 असा बाजूने उतार ठेवावा. खालच्या बाजूला जास्त उतार वाढल्यामुळे पाण्याबरोबर वाहत येणारी वाळू व रेती, गाळ तळात न साठता प्रवाहाबरोबर वाहून जाईल हा त्यामागील उद्देश आहे. या खोदतळामुळे खालच्या बाजूच्या विहिरीचे पाणी बाजूला वाढण्यास मदत होते.
खोदतळयाच्या जागेची निवड :-
- ज्या ठिकाणी नालापात्र किंवा नाल्याचा प्रवाह सरळ रेषेत असेल अशीच जागा खोदतळयासाठी निवडावी. ज्या ठिकाणी नाल्यास वेडीवाकडी वळणे असतील अशा जागी खोदतळे करु नये.
- नालाप्रवाहाच्या दिशेने दोन्ही बाजुंना ठराविक उतार द्यावयाचा असल्याने त्या उतारानुसार प्रथम तळयाची जागा निश्चित करुन कमीत कमी तेवढया लांबीचे नालापात्र त्या ठिकाणी सरळ रेषेत असणे आवश्यक आहे.
- वरच्या बाजूचा उतार खालच्या बाजूच्या उतारापेक्षा जास्त ठेवावा. त्यामुळे पाण्याबरोबर वहात येणारी वाळू, रेती, गाळ इ. तळयात खोलीनुसार उतार निश्चित करावा. हा उतार साधारणपणे 3:1 व 5:1, 4:1 व 8:1 आणि 6:1 व 10:1 आर ठेवावा.
- तळयाच्या खालच्या बाजूस 3 मी. रुंदीच्या पट्टयात व उतारावर 2 मी. रुंदीच्या पट्टयात खस गवत लावावे. यामुळे नालाकाठावरील जमिनीच्या धुपेमुळे येणारी माती, गाळ इ. अडविली जाईल व ती तळयात येणार नाही आणि तळे बुजणार नाही
- तळयाच्या वरच्या बाजूस म्हणजे ज्या बाजूने पाणी तळयात उतरते त्या बाजूस 2 मी. रुंदीच्या व त्यापुढे 3 मी. रुंदीच्या पट्टयात खस गवत लावावे. यामुळे प्रवाहाबरोबर येणारा गाळ गडविला जाईल व तळे बुलणार नाही
- तळयाच्या जळात वरच्या बाजूस 2 मी. व खालच्या 3 मी.पर्यन्त असे एकूण 5 मी. रुंदीत दगडी पिचिंग करावे. यामुळे तळयाच्या तळाची धूप होणार नाही.
- नाल्याच्या काठाकडून दोन्ही बाजूंना तळयाच्या माथ्यापर्यन्त 3:1 उतार द्यावा. समजा नाल्याची रुंदी 18 मी. आहे तर,
- त्याच्या काठाकडुन मध्यापर्यन्त 3:1 उतार द्यावयाचा आहे. मध्यापासून अंतर 18/2 = 9 मी. आहे. म्हणजे तळयाची खोली 9/3 = 3 मी. होईल.
- समजा तळ्याचा उतार 6:1 व 10:1 असा ठेवला तर तर वरच्या बाजूची एकूण लांबी 3 * 6 = 18 मी. होईल. खालच्या बाजूची एकूण लांबी 3 * 10 = 30 मी होईल म्हणजे तळ्याची एकूण लांबी 18 + 30 = 48 मी. होईल.