जैविक बांधासह समपातळी बांध

जैविक बांधासह समपातळी बांध (व्हेजिटेटिव्ह कंटूर हेजेस वुईथ फरोज)

वहितीखाली नसलेल्या क्षेत्राचा 1 मीटर इंटरव्हलचा कंटूर (समपातळी) नकाशा काढून ज्या ठिकाणी आतापर्यंत मातीचे कंटूर (समपातळी) बांध घालीत होतो, त्या ठिकाणी मातीचे बांधाऐवजी व्हेजिटेटीव्ह कंटूर हेजेस टाकावयाचे आहेत. खस गवताची ओळ लावण्यासाठी चर तयार करावयाचे आहे. हा चर 20 सेंटीमीटर खोल व 30 सें.मी. रुंद असावा. खस गवताची एक बांधावर ओळ लावावी. दोन खस स्लीप्समध्ये 10 सें.मी. अंतर असावे. 100 ते 120 मीटर लांबीसाठी सुमारे 35 किलो खस गवताच्या स्लीप्स लागतील. खस गवत नजीकच्या नर्सरीमधून मिळवावे लागेल. पाणलोट क्षेत्रात पुढील वर्षी वहितीखाली नसलेल्या क्षेत्रात लावावयाच्या व्हेजिटेटीव्ह कंटूर हेजेससाठी किती खस गवत लागेल त्यासाठी यावर्षीच नर्सरीची तजबीज करावी लागेल. नर्सरी व ज्या क्षेत्रात कंटूर हेजेस लाववयाचे आहेत, त्यात कमीत कमी अंतर असावे, म्हणजे खस गवत नर्सरीमधून काढून शेतावर लावण्यास कमीत कमी वेळ खर्च होईल, व खस गवत लावण्याचे प्रमाण वाढेल. व्हेजिटेटिव्ह कंटूर हेजेससाठी लागणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे. त्याला सक्षम अधिका-याची मान्यता घ्यावी.