शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पत हमी निधी योजना
पत हमी निधी योजनेची उदिदष्टये:
या निधीची उभारणी ही प्रामुख्याने पात्र कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना करावयाच्या तारण मुक्त कर्ज पुरवठयामधील जोखीम कमी करण्यासाठी रु.१००.०० लाख रकमेच्या मर्यादेत पत हमीची सुरक्षा देण्यासाठी करण्यात आली आहे.
उत्पादक कंपनीच्या पात्रतेचे निकषः
- पुढील पात्रता धारण करणा-या शेतकरी उत्पादक कंपन्या पत हमी निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- कंपनी कायदया खालील नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या सर्व शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेसाठी पात्र असतील.
- कंपनीच्या ज्ञापन किंवा उप-विधीमध्ये नमूद केले प्रमाणे कंपनीने आपले सभासदाकडून उभा केलेला समभाग निधी असणे आवश्यक आहे.
- शेतकरी उत्पादक कंपनीच्या वैयक्तिक भागभांडवल धारकांची संख्याही ५०० पेक्षा कमी नसावी.
- शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण भागधारक सभासदांपैकी किमान ३३ टक्के इतके भागधारक हे अत्यल्प,अल्प व भूमिहीन खंडकरी शेतकरी (Tenant farmers) असावेत.
- संस्थात्मक भागधारकाशिवाय कोणत्याही एका वैयक्तिक भागधारकाचे शेतकरी उत्पादक कंपनीतील एकूण समभाग हे कंपनीच्या एकूण समभागाच्या ५ टक्के पेक्षा जास्त नसावेत.
- शेतकरी उत्पादक कंपनीचे नियुक्त किंवा निवडून आलेले संचालक मंडळ असावे ज्यामध्ये शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करणारे सभासदासह किमान एक महिला सभासद असावी.
- शेतकरी उत्पादक कंपनीची निवडून आलेली व्यवस्थापन समिती असावी.
- शेतकरी उत्पादक कंपनीचा व्यवसाय आराखडाव १८ महिन्याचे अंदाजपत्रक असावेत.
शेतकरी उत्पादक कंपनीचा प्रस्ताव कर्ज पुरवठादार संस्थांकडे किंवा बँकेकडे सादर झाल्यानंतर तसेच सदर कर्ज पुरवठादार संस्थेने किंवा बँकेने अर्ज प्राप्तीनंतर सहा महिन्याच्या आंत लिखित स्वरुपात बँक कर्ज देण्याचे मान्य केलेले अथवा मुदत कर्ज किंवा खेळते भांडवल देण्यास तयार असलेबाबत कळवावे व त्यासाठी कोणत्याही तारणशिवाय किंवा सभासदाच्या वैयक्तिक तारणाशिवाय किंवा इतर पर्यायी हमीची गरज नाही.
पत हमी सुरक्षा (Credit Guarantee Cover):
- एका शेतकरी उत्पादक कंपनी लापत सुविधा पुरविण्यासाठी पतपुरवठा करण्या-या बँका किंवा संस्थां यांना पाच वर्षात कमाल दोन वेळा या पत हमी सुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल.
- पत सुविधा पुरविण्या-या संस्था किंवा बँका यांना एकूण पात्र व मंजूर पत सुविधेच्या ८५ टक्के पर्यंत किंवा रु.८५ लाख यापैकी जे कमी असेल तो पत हमी सुरक्षा निधी मिळेल.
- थकबाकीदार कंपनीच्याबाबत एकूण थकबाकी रकमेच्या ८५ टक्के किंवा वर नमूद केलेल्या प्रमाणे जे कमी असेल तेव्हढी पत हमी सुरक्षा मिळेल
- पात्र पत पुरवठा बँका किंवा संस्था यांनी करारा प्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनीस पतपुरवठा करतांना त्यांना पत हमी सुरक्षा अंतर्गत मिळणा-या रकमेत इतर,फी व सेवा कर जो त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीस लागू केलेला असेल त्याचा समावेश होणार नाही.
कृषि व्यापार संघ यांनी वेळोवेळी निर्धारीत केलेल्या अटी व शर्ती अन्वये व पात्र पतपुरवठा करणा-या संस्था किंवा बँका यांनी संबंधित छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाबरोबर केलेल्या करारानुसारच संबंधितास पत हमी सुरक्षा योजने अंतर्गत लाभ मंजूर करण्यात येईल.
अर्ज प्रक्रियाः
पत हमी निधी योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र पत संस्था किंवा बँका यांना छोटया शेतक-यांचा
कृषी व्यापार संघ यांचे विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील.परंतु ज्या तिमाहीमध्ये त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना मुदत कर्ज दिलेले असेल त्याच्या लगेचच पुढील तिमाहीची मुदत संपन्या अगोदर अर्ज करणे आवश्यक असते. उदा. पत सुविधा मंजूरी जर एप्रिल ते जून या तिमाहीत असेल तर छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाकडे पत हमी निधीच्या मंजूरीसाठी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीची मुदत संपण्यापूर्वी अर्ज करणे आवश्यक राहील.
पत हमी निधी मंजूरी-
- योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र पतपुरवठा संस्था किंवा बँका यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी केल्यानंतरच छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघ पत हमी निधीची हमी देईल.
- आवश्यकतेनुसारव योजनेच्या हेतू प्रमाणे छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघ हे कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँका यांचे लेखे संदर्भातील दस्तऐवज तपासू शकतात किंवा दस्त ऐवजाच्या प्रती मागवू शकतात किंवा कर्जदार कंपनीच्या संदर्भातील लेखा विषयक दस्तऐवज पत पुरवठादार संस्थेच्या माध्यमातून मागवू शकतात.
- या प्रकारची छाननी ही छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाचे अधिकारी यांचेमार्फत किंवा छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघ यानी प्राधिकृत किंवा नियुक्त केलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून करुन घेवू शकतील.
- या छाननीच्या आधारे छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघा अंतर्गत (Investment and Claim Settlement Committee ,I&CSC) समितीद्वारे पत हमी निधीची रक्कम मंजूर करण्यात येईल.
पतपुरवठा करणारी संस्था किंवा बँका यांनी त्यांच्या बँक किंवा शाखा स्तरावर किंवा शाखा व्यवस्थापक स्तरावर छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाबरोबर करार करणे आवश्यक राहील.
हमीशुल्कः
- पत पुरवठा संस्था किंवा बँका यांनी पत हमी निधी योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी या कर्जदारास पत सुविधा पुरविलेली असल्यास पत पुरवठादार संस्थांनी छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाकडे एकदाच अदा करावयाच्या ०.८५ टक्के दराने हमी शुल्क जास्तीत जास्त (रु.८५,०००/-)एवढे भरणेआवश्यक राहील.
पत हमी निधी योजनेअंतर्गत सुरक्षा मिळविण्यासाठी पत पुरवठादार संस्था किंवा बँकामार्फत छोटयाशेतक-यांचा कृषी व्यापार संघ यांचेकडे पत हमी निधीची मंजूरी मिळाल्यापासून ३० दिवसांचे आत हमीशुल्क भरणे आवश्यक असून तसे न केल्यास पत हमी निधीची सुरक्षाही संबंधित पत पुरवठा बँकेस मिळू शकणार नाही व त्यासाठी त्यांना छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाकडून पुनश्च मंजूरी घ्यावी लागेल.
- पात्र पत पुरवठादार संस्था किंवा बँका यांचेकडून हमी शुल्क स्विकारल्यानंतर छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघ पुढील बाबींची खातरजमा करील.
- अर्जदार संस्थेने पत पुरवठा करणा-या संस्थेकडे जमा करावयाचे कोणतेही हप्ते हे थकीत नसावेत.(Non-Performing Assets) थकीत कर्जाचे कुठल्याही वेळी पुनर्गठन झालेले नसावे
- ज्या व्यवसायासाठी कर्ज पुरवठादार संस्थेने कर्जदार संस्थेस कर्ज पुरवठा केलेला आहे तो चालू असणे आवश्यक असून तो बंद पडलेला नसावा.
कर्जदार कंपनी किंवा संस्थेने कर्ज घेतल्यानंतर त्याची सर्व रक्कम किंवा त्याचा काही भाग व्यवसायासाठी वापरला पाहिजे तो निधी इतर संस्थाचे कर्ज हप्ते परत करण्यासाठी वापरला असल्यास तो शंकास्पद मानला जाईल.
वार्षिक सेवा शुल्क :
एकदाच अदा करावयाच्या हमी शुल्का शिवाय वार्षिक सेवा शुल्क ०.२५ टक्के प्रतिवर्ष किंवा वेळोवेळी ठरविण्यात आलेले शुल्क पात्र पतपुरवठा सस्थांकडून सुरक्षा हमीची सुविधा चालू ठेवण्यासाठी आकारण्यात येईल.हे दोन्ही प्रकारचे सेवा शुल्क हे कर्जदाराकडून वसूल करावे किंवा करण्यात येऊ नये त्याबाबत सेवापुरवठादार संस्था निर्णय घेईल.वार्षिक सेवा शुल्क हे पुरवठा संस्थेने छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाकडे प्रत्येक वर्षी ३१ मे पर्यंत अदा करावे.
पत पुरवठादार संस्था किंवा बँका यांनी छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघ यांचेकडे वार्षिक सेवा शुल्क वेळीच भरले नसल्यास योजनेअंतर्गत त्यांना मिळणारे छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघ यांचेकडील पत हमीची सुरक्षा संपुष्टात येईल व ती पुनश्च सुरु करण्यासाठी विशेष दंडात्मक व्याजासह जे वार्षिक सेवा शुल्काच्या दरापेक्षा १ टक्क्यानी जास्त असेल व कर्जदारास आकारलेल्या व्याज दरापेक्षा जास्त असेल किंवा विलंबाचा कालावधीनुसार छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार असेल. सदर सेवा शुल्क प्राप्त झाल्यानंतर पत हमी निधीची सुरक्षा व हमी पुढे चालू ठेवण्यात आल्याचे मानन्यात येईल.
ठरवून दिलेल्या वेळेत किंवा पात्र सेवा पुरवठादार संस्थांनी वाढवून घेतलेल्या वेळेत ही जर वार्षिक सेवाशुल्क भरले नसल्यास पत हमीची जबाबदारी राहणार नाही.परंतु छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघ हे पत हमी निधी नूतनीकरणाबाबत काही अटी व शर्तींनुसार पुनश्च निर्णय घेऊ शकेल.परंतु आर्थिक सेवा शुल्क भरण्यात विसंगती व त्रुटी आढळल्यास सेवा पुरवठादार संस्थांनी भरलेली हमी शुल्क किंवा वार्षिक सेवा शुल्क इत्यादीची रक्कम परत करता येणार नाही.
योजने अंतर्गत कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँकाची (Eligible Lending Institutes)जबाबदारी.
- कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँका यांनी छोट याशेतक-यांचा कृषि व्यापार संघ यांचेकडे प्रस्तावांची शिफारस करण्यापूर्वी खालील बाबींची काळजी घ्यावी.
- प्रत्येक कर्ज प्रस्ताव हा उत्पादनशील व्यवसाय प्रकल्प असल्याची खात्री करावी.त्याचबरोबर बँकांनी पत हमी निधीसाठी अर्ज करतांना त्याबरोबर बँकांनी प्रकल्पाच्या किंमतीची माहिती देणे आवश्यक राहील.
- छोटयाशेतक-यांचाकृषि व्यापार संघाच्या अटी व शर्ती त्याच प्रमाणे पत पुरवठादार बँका यांचे आवश्यकतेप्रमाणे पत हमी निधीच्या मंजूरीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी.योजने अंतर्गत मंजूरीसाठी छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघास आवश्यक असणारे सर्व महत्वाचे दस्तऐवज बँकानी छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ यांना सादर करणे आवश्यक राहील व सर्व दस्तऐवज प्रमाणित केलेले असावेत.
छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाचे सनियंत्रणः
कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँका शेतकरी उत्पादक कंपनीने घेतलेल्या कर्जाचे सनियंत्रण करतील. छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ हे अशा सनियंत्राणाचा अहवाल कर्ज पुरवठादार संस्था किंवा बँका यांचेकडून मागावून घेतील.पत हमी निधी योजनेसाठी छोटयाशेतक-यांचा कृषि व्यापार संघ यांची दोन स्तरीय नियंत्रण करण्याची पध्दती असेल.ज्यामध्ये छोटयाशेतक-यांचा कृषि व्यापार संघाचे संचालक मंडळ हे सर्वप्रकारचे निर्णय व धोरण ठरविण्यासाठी प्राधिकृत केलेले आहे.
छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाचे संचालक मंडळ हे कार्यकारी निर्णय घेण्याचे अधिकार हे यांचेकडे सोपवू शकते.
हमीची घोषणाः
योजनेच्या अटी समाधानकारक पूर्ण केल्यास बँका एक वर्षाच्या (NPAच्या तारखेपासून) अधिकतम कालावधीत पत सुविधा संदर्भात हमीची घोषणा करु शकतात.बँकांनी दावा हा त्या त्या विभागीय कार्यालय, प्राधिकृत कार्यालय किंवा व्यक्ति यांचेमार्फत छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ यांना सादर केलेला असावा.पत पुरवठयाच्या सुविधेची हमीही NPA होण्या अगोदरच्या कालावधीत सुरु असलेली हवी.पत हमी निधी योजनेअंतर्गत बँकांना देय असलेली रक्कम ही कर्जदार यांनी जमा केलेली नसावी आणि सदर रक्कम ही थकबाकी रक्कम म्हणून वर्गीकृत केलेली असावी.
पत हमी निधी योजनासाठी प्रकल्प विकास सुविधाःProject Development Facility
छोटया शेतक-यांचा कृषी व्यापार संघाने नियुक्त केलेल्या मान्यता प्राप्त सल्लागार संस्था यांचेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना योजनेअंतर्गत अर्ज करणे,प्रकल्प अहवाल तयार करणे यासाठी आर्थिक सहाय्य देय आहे.
महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघामार्फत राबविण्यात येणा-या योजना कृषि उद्योगासाठी बिनव्याजी भांडवल कर्ज योजना
शेती हा देशातील सर्वात मोठा खाजगी क्षेत्रातील व्यवसाय आहे. देशातील ग्राहकांच्या बदलत्या आहारामुळे आणि उच्च मूल्यांकित प्रक्रियायुक्त उत्पादनांच्या वाढत्यामागणीमुळे या क्षेत्रास मोठा वाव आहे. अशा यशस्वी उपक्रमासाठी नवनवीन कल्पना आणि उद्योगातील भागीदारी याची आवश्यकता आहे. खाजगी कृषि उद्योग हा शेतमालाच्या विक्रीसाठीचा पहिले केंद्र असून या क्षेत्राची वाढ ही प्रामुख्याने खाजगी उपक्रमावर अवलंबून आहे. अशा छोटया आणि मध्यम कृषि उद्योगाचा महत्वाचा परिपाक म्हणजे मोठया कृषि उदयोगाचा विकास होय. उत्पादक ते ग्राहक या पुरवठा साखळीतील संधी प्राप्त करुन घेण्यासाठी विविध ठिकाणी हे उद्योग असणे आवश्यक आहेत. परंतु कृषि उद्योगाची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणा-या कर्जाची उपलब्धता ही नविन कृषि उद्योगांच्या विकासाच्या आड येणारी अडचण आहे. सर्वसाधारणपणे कृषि उद्योगामध्ये नव्याने येणा-या उद्योजकाकडे व्यवसाय कौशल्य असते परंतु कृषि उद्योगासाठी शेतक-यांच्या उत्पादित मालाची खरेदी करुन आर्थिक गुंतवणूकीस त्यांना मर्यादा येतात.
छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाच्या (SFAC) वित्तीय सहभागातून देशात कृषि उद्योग विकासास चालना देण्यासाठी कृषि उद्योग सुरु करण्यासाठी सहाय्य करणे आणि त्याचबरोबर प्रकल्प सुविधा (Project Deveopment Facility) च्या माध्यमातून बँकेशी निगडीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा या योजनाचा महत्वाचा हेतू आहे.
उददेशः
कृषी उद्योगामध्ये खाजगी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन व विक्रीची हमी देऊन त्याद्वारे ग्रामीण उत्पन्न व रोजगार वाढविणे, कृषी उत्पादन व प्रक्रिया ही साखळी मजबूत करणे, शेतकरी उत्पादकगट ,कृषीपदवीधर यांचा सहभाग वाढविणे आणि कृषी प्रक्रीया प्रकल्प सुरु करण्याच्या हेतूने कृषी उद्योजकांसाठी प्रशिक्षण व भेटी आयोजित करणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत.
योजनेची ठळक वैशिष्टयेः
कृषि उद्योगास मुदत कर्ज मंजूर करणा-या बँकाकडून प्रकल्प उ'द्योकास उपलब्ध होणा-या वित्तीय पुरवठयामधील तफावत दूर करण्यासाठी बिनव्याजी भांडवल पुरवठा करणे हे या योजनेचे ठळक वैशिष्टये आहे.
योजने अंतर्गत पात्र प्रकल्प, पात्र व्यक्ती आणि पात्रवित्तीय संस्था
कृषि पूरक क्षेत्रातील किंवा कृषि सेवांशी संबंधित प्रकल्प ज्याच्या उत्पादनास हमखास बाजारपेठ आहे तसेच शेतक-यांना विविध उच्च मूल्यांकीत पिके आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देणारे प्रस्तावित प्रकल्प आणि बँकेने मुदत कर्ज मंजूर करण्यासाठी स्विकारलेले प्रकल्प हेया योजनेअतंर्गत सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
या योजनेअंतर्गत व्यापारक्षम कृषिप्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी खाजगी व्यक्ति,शेतकरी, शेतकरी उत्पादकगट, भागीदारी/मालकीचे उद्योग, स्वयंसहाय्यता गट, कंपनी, कृषिउद्योजक, कृषिनिर्यात क्षेत्रातील उ'द्योग, व्यक्तीगत कृषि पदवीधर अथवा कृषि पदवीधरांच्या गटास सहाय्य देण्यात येते.
भारतीय रिझर्व बँकेने सूचित केलेल्या सर्व बँका किंवा वित्तीय संस्था जेथे राज्य किंवा केंद्र शासनाची मालकी ही ५० टक्केपेक्षा जास्त आहे, जसे राष्ट्रीय कृत बँक, भारतीय स्टेट बँक आणि तिच्या उपकंपन्या आयडीबीआय, नाबार्ड, एनसीडीसी, उएनईडीएफ, आरआरबीएस व राज्य वित्तीय़ महामंडळे या पात्र वित्तीय संस्था आहेत.
योजनेअंतर्गत कर्ज मर्यादाः
या योजने मध्ये मिळणारे अर्थसहाय्य हे प्रकल्प खर्चावर अवलंबून असून बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पा मधील बँकांची कर्जाची रक्कम वगळता उ'द्योजकांनी स्वतः केलेल्या गुंतवणूकीच्या २६ टक्के एवढी रक्कम तसेच शेतकरी उत्पादक कंपनीने (FPC) पुरस्कृत केलेल्या कृषि उ'द्योगास त्यांच्या स्वगुंतवणूकीच्या किमान ४० टक्के आहे. या योजने अंतर्गत अधिकतम अर्थसहाय्याची मर्यादा ही रु.५०.०० लाखपर्यंतच आहे.
प्रस्तावित कृषि प्रकल्पाची किंमत ही किमान रु.१५.०० लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त व कमाल मर्यादा रु.५०० लक्ष इतकी असावी. तथापि, नियोजन आयोगाने प्रस्तावति केलेल्या अनुसूचित म्हणून मागास जिल्हयांमध्ये प्रकल्प किंमत रु.१०.०० लक्ष आणि त्यावरील असेल. प्रकल्पास जास्त बिनव्याजी भांडवली कर्ज देण्याबाबत छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाच्या कार्यकारी समितीला अधिकार राहतील. लाभार्थी यांनी सविस्तर अहवाल बँकांना सादर करणे आवश्यक आहे.
सविस्तर प्रकल्प अहवाल मिळाल्यानंतर बँका त्याचे मूल्यमापन करुन आवश्यक मुदत कर्ज लाभार्थ्यास मंजूर करतात. योजनेचे निकष व योग्यतेनुसार बँका प्रकल्पास लागणा-या बिनव्याजी भांडवल कर्ज रक्कम ठरवून छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघा कडे शिफारशीसह कळवितात .छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ हे बँकेने शिफारस केलेली रक्कम लाभार्थ्यास उपलब्ध करुन देण्याकरीता बँकेस सादर करतात . ती रक्कम बँक प्रकल्प उ'द्योगास टप्प्या-टप्याने अथवा एक रकमी भांडवल स्वरुपात (बँकेला योग्य वाटेल त्याप्रमाणे) उपलब्ध करुन देतात.
बँकेकडून घेतलेल्या मुदत कर्जाची संपूर्ण परत फेड होईपर्यंत छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाकडून मिळणारे अर्थ सहाय्य हे बिनव्याजी भांडवली कर्ज स्वरुपात राहते, आणि नंतर ही रक्कम आपोआप मुदत कर्ज म्हणून रुपांतरीत होते. या सर्व रकमेची परतफेड होई पर्यंत ही रक्कम मुदत कर्ज म्हणूनच राहील. छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाकडून मिळालेले अर्थसहाय्य हे मुदत कर्जात रुपांतरीत झाल्यानंतर कर्जाची रक्कम ही छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाला एक रकमी अथवा चार हप्त्यात मुदत कर्जावर ठरविलेल्या व्याजासह परत करावयाची असते.
मुदत कर्जाच्या कालावधीत उद्योजकाकडे असणारी प्राथमिक अथवा तत्सम मालमत्ता बँकेकडे तारण म्हणून राहते आणि बिनव्याजी भांडवली अर्थ सहाय्य रकमेची संपूर्ण परतफेड झाल्याशिवाय तारण मालमत्ता बँकेकडून लाभार्थ्यास अथवा दुस-या संस्थेस दिली जात नाही. कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाला उपलब्ध करुन देण्यात येते.
प्रकल्प अमंलबजावणी बाबतची प्रगती, मुदत कर्जाची केलेली परतफेड आणि प्रकल्पाची स':स्थिती याबाबतची माहिती उ'द्योजकास छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघास अवगत करावी लागते. बँकेने छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाकडून मिळालेल्या निधीचा वेगळा हिशोब ठेवून रक्कम प्रकल्प कार्यवाही साठी उद्योजकास जशी लागेल तशी उपलब्ध करुन द्यावयाची असते. उद्योजकाने नियोजित वेळापत्रकानुसार बिनव्याजी भांडवली अर्थसहाय्य परत केलेले असेल तर त्यानंतर दुस-या बिनव्याजी भांडवली अर्थसहाय्याचा लाभ घेवू शकतात.
प्रकल्प उद्योजकाची भूमिकाः
उद्योजकयांनी कृषि प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कर्ज मंजूरीच्या वेळी ठरविलेल्या वेळा-पत्रकानुसार प्रकल्पाची सुरुवात करणे आवश्यक असते .कृषि व्यापार संघाचे बिनव्याजी भांडवली कर्ज पूर्ण परतफेड करेपर्यंत उद्योजकांना ते बँकांकडे एफडीआरसह सुरक्षा जामीन ठेवण्याची हमी द्यवी लागते. बँकेच्या मुदत कर्जाची परतफेड केल्यानंतर उद्योजकांना बँकेकडील तारण हे छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाकडे वर्ग आवश्यक असते. व कृषि व्यापार संघाकडील बिनव्याजी कर्जची परतफेड करण्याची ही कार्यवाही सुलभ होण्याकरीता कृषि व्यापार संघाबरोबर करार करणे आवश्यक असते. कृषि व्यापार संघ प्रकल्प अंमलबजावणी वर पूर्ण नियंत्रण ठेवते. वेळापत्रकानुसार करावयाच्या कार्यवाहीत कोणतेही बदल असल्यास उद्योजकांना ते त्वरीत बँकां व कृषि व्यापार संघाला कळविणे आवश्यक असते. कृषी उद्योजकांना त्यांच्या प्रकल्पाची भौतिक प्रगती, लेखापरीक्षण अहवाल प्रत्येक वर्षी बँक व कृषि व्यापार संघाला सादर करणे आवश्यक असते.
प्रकल्प विकास सुविधा (Project Development Facility):
शेतकरी उत्पादकगट, कृषिउद्योजक, निर्यात क्षेत्रातील प्रकल्प, कृषि पदवीधर यांना संघाच्या प्राधिकृत सल्लागार यांचे मार्फत बँकग्राहय प्रकल्प अहवाल तयार करण्याकरीता आर्थिक मदत देण्यात येते. प्रकल्प उद्योजकाची आर्थिक स्थिती, प्रकल्पाचा आकार, ठिकाण, व्यवसाय व त्याची व्याप्ती या नुसार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या खर्चाची तरतूद करण्यात येते.बँका किंवा छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघांच्या शिफारशीकरीता लाभार्थ्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प तपशिलासह जवळच्या प्राधिकृत सल्लागारांकडे संपर्क साधावा.
कृषि व्यापार संघ हे प्रकल्प विकास सुविधा योजने अंतर्गत कृषि व्यापार संघाच्या प्राधिकृत सल्लागारामार्फत बँक ग्राहय (Bankable)सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी रु.२५,०००/-ते रु.१.०० लाख पर्यंत रक्कम अदा करतो.नियोजित प्रकल्पहा रु.१५.०० लक्षापेक्षा जास्त किंमतीचा असावा.प्राधिकृत सल्लागारास शुल्क हे एकूण ३ टप्प्यात अदा केले जाते. कृषि व्यापार संघाने बिनव्याजी भांडवली कर्ज योजनेअंतर्गत प्रकल्पाचे चार श्रेणीत वर्गीकरण केले आहे. त्याअनुषंगाने प्राधिकृत सल्लागारास देण्यात येणारे प्रकल्प शुल्क पुढील प्रमाणे आहे.
प्रकल्प श्रेणी |
सल्लागार शुल्क |
श्रेणी-१- रु.१०.० लाख तेरु . २५.० लाख |
रु.२५,०००/- |
श्रेणी-२- रु.२५.० लाख ते रु .१.०० कोटी पर्यंत |
रु.५०,०००/- |
श्रेणी-३- रु.१.०० कोटी ते रु.३.०० कोटी पर्यंत |
रु.७५,०००/- |
श्रेणी-४- रु.३.०० कोटी ते रु .५.०० कोटी पर्यंत |
रु.१,००,०००/- |
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी समभाग निधी योजना (Equity Grant Scheme)
केंद्रीय कृषि विभागाने जानेवारी,२०१४ पासून छोंटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघामार्फत शेतकरी उत्पादक संस्थांना सहाय्य करण्यासाठी दोन योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. यामध्ये समभाग निधी योजना (Equity Grant Scheme)आणि पत हमी निधी (Credit Guarantee Fund Scheme) या योजनांचा समावेश आहे.
समभाग निधी योजनाः
योजनाची वैशिष्टयेः
शेतकरी उत्पादक कंपनीची व्यवहार्यता वाढवून ती टिकवून ठेवण्याबरोबरच उत्पादक कंपनीची पतयोग्यता वाढविणे आणि सभासदांच्या समभाग(शेअर्स)रकमेत वाढ करुन त्यांची कंपनीतील सहभागातून मालकी वाढविणे या प्राथमिक उदि्दष्ट पूर्तीसाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
पात्रतेचे निकषः
समभाग निधी योजनेचा लाभ घेण्यासाठीशेतकरी उत्पादक कंपनी ही नोंदणीकृत असणे आवश्यक असूनशेतकरी भागधारकांची संख्या ५० पेक्षा कमी नसावी. सर्वसभासदांकडून भाग भांडवल गोळा केलेले असावे. उत्पादक कंपनीच्या उपविधी (Bylaws)अन्वये या कंपनीमधील वैयक्तिक भरणा केलेले समभाग रु.३० लाखापेक्षा जास्त नसावा. तसेच उत्पादक कंपनीमधील एकू ण समभागाच्या किमान ३३ टक्के समभाग धारक हे अल्प,अत्यल्प व भूमीहीन खंडकरी शेतकरी असावेत.उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाव्यतिरिक्त (संस्था सभासदाशिवाय )इतर कोणत्याही वैयक्तिक सभासदाचे समभाग हेउत्पादक कंपनीच्या एकूण समभागाच्या ५ टक्क्यापेक्षा जास्त नसावेत त्याचप्रमाणेउत्पादक कंपनीमधील संस्था सभासदाचे समभाग हे कंपनीच्या एकूण समभागाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.शेतकरी उत्पादक कंपनीचे निवडून आलेले व्यवस्थापकीय संचालक मंडळ असणे अनिवार्य असून सदर संचालक मंडळावर सर्व शेतक-यांचे प्रतिनिधीत्व करणारे किमान ५ सदस्य व त्यामध्ये किमान एक महिला प्रतिनिधी असणे आवश्यक असेल.शेतकरी उत्पादक कंपनीने पुढील १८ महिन्याचे शाश्वत महसूलावर आधारीत व्यवसाय आराखडा निश्चित केलेला असावा.उत्पादक कंपनीचे बँकेत खाते असणे आवश्यक असून उत्पादक कंपनीचे किमान एक वर्षाच्या खर्चाचे लेखापरीक्षण हे सनदी लेखपालाकडून केलेले असावे.शेतकरी उत्पादक कंपनीने याअटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
योजनेचे फायदेः
पात्रताधारक शेतकरी उत्पादक कंपनीस त्यांच्या एकूण समभागाएवढा निधी या योजनेअंतर्गत मिळण्यास मदत होते. तसेच नोंदणीकृत झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ज्यांचे भागभांडवल अर्ज केलेल्या तारखेस जास्त नाही अशा कंपन्यांना प्राधान्य देण्यात येते त्यामुळे अशा कंपन्यांची भांडवलीपत विस्तारण्यास मदत होते. समभाग निधी हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदाने धारण केलेल्या समभागाइतकाच असतो व त्याची कमाल रक्कम रु.१०.००लाख प्रति शेतकरी उत्पादक कंपनी इतकी असते.
समभाग निधी रोखीने जमा करण्यात येतो. मंजूर केलेल्या समभाग निधीची रक्कम ही थेट शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. समभाग निधीची रक्कम प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत शेतकरी उत्पादक कंपनीने त्या रकमेचे अतिरिक्त समभाग हे भारधारकांना वर्ग करणे अनिवार्य असते.
निधी मंजूरी व वितरणः
भागधारकांच्या वर्गवारीनुसार प्रत्येकास प्राप्त होणारी समभाग निधीची अधिकतम रक्कम ही वैयक्तिक भागधारकास रु.१०००/- आणि वैयक्तिक भागधारकाचा गट/समुह(उदा.स्वंयसहाय्यता गट/शेतकरी गट) यांनाएकूण सभासद संख्याप्रमाणे प्रती समभाग(शेअर)रु.१०००/- आणि जास्तीत-जास्त रक्कम रु.२०,०००/- पर्यंत असेल.संस्थात्मक भागधारक (उदा.शेतकरी उत्पादक कंपनी) त्यांचेसाठी रु.१.०० लाख एवढे असेल.
शेतकरी उत्पादक कंपनीस समभाग भांडवलाची रक्कम ही कमाल दोन हप्त्यात काढता येते.पहिला हप्ता अर्ज केल्यापासून २ वर्षाच्या आत आणिकमाल मर्यादा रु.१०.०० लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनीआहे.जर शेतकरी उत्पादक कंपनीने पहिल्या हप्त्यात रु.१०.०० लाखापेक्षा कमी भाग भांडवल घेतले असेल,पण उत्पादक कंपनीने आपली सभासदांची संख्यावाढवून भांडवल कमाल मर्यादा रु.१० लाख इतके उभे केल्यास दुस-या हप्त्यासाठी केलेला अर्ज हा नवीन अर्जाप्रमाणे गृहित धरला जातो व त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागते.
मंजूरीच्या अटी स्विकारल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघांशी करारबध्द होईल.
- मंजूर निधीची रक्कम शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.
- मंजूर झालेल्या समभाग निधीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीने समभाग निधीच्या प्रमाणात प्राप्त झालेले अधिकचे समभाग हे ४५ दिवसांपर्यंत समभाग धारकांच्या नावावर जमा करणे आवश्यक असते.
- शेतकरी उत्पादक कंपन्यांनी समभाग निधी अंतर्गत प्राप्त झालेली रक्कम ही भागधारकाच्या नावे जमा केल्याचे प्रमाणपत्र छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाला कळविणे आवश्यक आहे.
- शेतकरी उत्पादक कंपनीशी झालेल्या करारा अन्वये छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघ,नवी दिल्ली हे भागधारकांच्या खात्यावरील समभाग निधीची माहिती तपासू शकते.
- शेतकरी उत्पादक कंपनीने छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाबरोबर लेखी करार केल्यानंतरच समभाग निधी योजनेच्याअंतर्गत अर्थसहाय्य वितरण करण्यात येते.
याबाबत कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन किंवा करारनाम्यातील अटी व शर्तींचे अनुपालन न केल्यास छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघहे समभाग निधी योजनेची रक्कम परत मागावू शकते व ते कंपनीवर बंधनकारक असते.छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघ (योजनेच्या मर्यादेत) कायदेशीर कारवाई करु शक.ते.
कार्यपध्दतीः
प्रत्येक भागधारकास एक समभाग प्राप्त व्हावा यासाठी भागधारकांच्या चालू भाग भांडवलाच्या प्रमाणात समभाग वाटप करण्यात येते.परंतुमंजूर समभाग निधीची रक्कम ही जर सर्व भागधारकास किमान एक समभाग मिळण्याइतकी अपुरी असल्यास समभाग निधीचे वाटप हे समभाग धारकाच्या चालू जमीन धारणे एवढे करावे लागते.परंतु त्यासाठी कमीत-कमी जमीन धारकाच्या वाटपापासून सुरुवात करण्यात यावी.यासाठी पारदर्शक पध्दतीचा अवलंब करावा की ज्यामुळे भाग धारकाची ओळख अगोदर कळणार नाही.
अर्ज प्रक्रियाः
- पात्रता धारक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी समभाग निधीच्या सहाय्यासाठी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.आवश्यक कागदपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
- सनदी लेखापाल यांनी तपासून प्रमाणित केलेली समभाग धारक व त्यांचे भागभांडवलासह यादी.
- शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचा समभाग निधी योजनेत सहभाग नोंदविण्याबाबतचा मंजूर ठराव.
- भागधारकांची संमती,यामध्ये भागधारकाचे नांव,लिंग,त्यांचे एकूण भागभांडवलाचे दर्शनी मूल्य,जमीन- धारणा या माहितीसह छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघास देण्यात आलेली संमती,त्यामध्ये कंपनीमध्ये भाग धारकांच्या भाग भांडवला इतक्या रकमेचे अतिरिक्त समभाग निधी हे कंपनीच्या खात्यावर जमा करुन वैयक्तिक भागधारकास मिळणेबाबत माहितीचा समावेश असेल.त्याचप्रमाणे नियमाप्रमाणे कंपनीतून बाहेर पडणे किंवा समभाग हस्तांतरीत करणेबाबतच्या प्रक्रियेची माहिती असावी.
- सनदी लेखापाल यांचेकडून तपासून प्रमाणित केलेले कंपनीच्या नोंदणी झालेल्या वर्षापासून सर्व वर्षाचे खर्चाचे लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक.
- ज्या बँकेच्या शाखेत शेतकरी उत्पादक कंपनीचे बँक खाते उघडण्यात आलेले आहे अशा बँकेच्या व्यवस्थापकाकडून प्रमाणित करण्यात आलेले बँकेच्या खाते पुस्तकातील एकूण मागील महिन्यांच्या नोंदीची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.
- नोंदणीकृत कंपनीचा व्यवसाय आराखडा व पुढील १८ महिन्यांच्या अंदाजपत्रकाची माहिती सादर करणे आवश्यक असेल.
- समभाग निधी योजनेअंतर्गत संचालक मंडळाने स्वाक्षरी व अंमलबजावणीसाठी शेतकरी उत्पादक कंपनीने प्राधिकृत केलेले संचालक यांची सविस्तर माहिती ज्यामध्ये त्यांचे नांव,छायाचित्र,ओळखीचा पुरावा (यासाठी शिधापत्रिका,आधार कार्ड, निवडणूकपत्र, पारपत्र याचा समावेश आहे) सादर करणे आवश्यक राहील.
- अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या सर्व दस्तऐवजांच्या सर्व पृष्ठांवर किंमान दोन संचालक मंडळाचे सदस्य किंवा कंपनीचे प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक राहील.
- शेतकरी उत्पादक कंपनीने त्यांची पतविश्वासार्हता शाश्वतता व उत्पादकता निर्धारीत करण्यासाठी त्यांचे प्रशासकीय बाबी, व्यवसाय आराखडयाची उत्पादन क्षमता,व्यवस्थापकीय क्षमता व वित्तीय शिस्त याचा विचार करुन समभाग निधी योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा.
वरील बाबींची सत्यता व विश्वाससार्हता ही योजनेअंतर्गत समभाग निधी अर्थ सहाय्य मिळविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्राच्या आधारे,प्रत्यक्ष भेटीतून व पुरस्कर्त्या संस्थेच्या माध्यमातून पडताळून पाहण्यात येईल.
लवादः
छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व त्याअंतर्गत अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्यास तसेच समभाग निधी योजनेअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या रकमेचा गैरवापर झाल्यास किंवा अफरातफर केल्यास छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघ तो सर्वच्या सर्व निधी परत घेण्यास व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सक्षम आहे.
छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेतील करार हा प्रचलित कायदयानुसार करण्यात येईल. या कराराबाबत काही विवाद किंवा दावे निर्माण झाल्यास किंवा कराराचा भंग झाल्यास किंवा मोडल्यास, कायदेशीर पध्दतीने व दिल्लीस्थित लवादाच्या निर्णयाच्या निकालानुसार सोडविण्यात येईल.तथापि,कोणतीही कायदेशीर कृती करण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी सर्वोतपरी प्रयत्न व चर्चेतून सर्व समावेशक समझोता शोधणे आवश्यक राहील.
अ.क्र. |
सल्लागाराचे नांव व पत्ता |
संपर्क |
१ |
मोदी आणि अग्रवाल,सनदी लेखापाल
“मोदी हाऊस” घ.नं.३२१७/७ आग्रा रोड,धुळे-४२४००१ |
(T) 02562-234571
(M) 9422285096 |
२ |
भुतडा मुदडा आणि कंपनी,सनदी लेखापाल
०३ राधाकृष्ण हाईटस,१४३५, एस.पी.कॉलेजसमोर
टिळक रोड,सदाशिवपेठ पुणे-३०. |
(T) 020-24460155
(M) 9422517160 (E) ca@bhutadamundada.org (W) www.bhutadamundada.org |
३ |
घेवारे फायनान्सियल र्सव्हिसेस,
४ नॉर्थ शिवाजीनगर,दडगे मुलींच्या हायस्कुलमागे,सांगली. |
(T) 0233 2373506, 2374483
(M) 9372140131 (E) vg8480@yahoo.com |
४ |
ओरिएंटल अॅग्रो टेक प्रा.लि.
एनआयआयटी कमर्शियल कॉम्प्लेक्स,अंबाझारी रोड,नागपूर |
(T) 0712-2243118, 2245275
(M) 9096253213
(F) 0712-2243115 (E) oriental2@rediffmail.com |
५ |
सनराईज बायोटेक कन्सल्टन्सी र्सव्हिसेस,
एस-४,जी विंग,प्लोरेन्टाईन,सोपानबागेजवळ,घोरपडी,पुणे-४११ ००१. |
(T) 020- 26823353
(M) 9822417412 (E) bbgunjal@yahoo.com |
६ |
टाईमॅक्स प्रोजेक्ट अॅन्ड फायनान्शियल सर्व्हीसेस
हाऊस ऑफ फायनान्स अॅन्ड इन्शुअरन्स
बी.नं.१,सरदार हौसिंग सोसायटी,त्र्यंबकरोड, नाशिक-४२२ ००२. |
(T) 0253-2577699
(M) 9823378330 (E) timexcons@gmail.com |
७ |
मुकेश वर्मा ग्रीन नेटवर्क
ग्रीन पार्क बंगला नं.१,लोढा हेवन,डोंबिवली(पु.)-४२१ २०४. |
(M) 9322112365
(F) 2512830651 (E) mukesh@mukeshvarmagreennetwork.com |
८ |
अश्वथा अॅडव्हाझर्स प्रा.लि.
युनिट ६, नीरु सिल्क मिल्स,मॅटीहुराडस मिल्स कंपाऊड,१२६,एन.एम.जोशी मार्ग,लोअर परेल (प.) मुंबई-४०० ०१३. |
(T) 022-61283200
(M) 9819006428 (E) pgupta@tns.org |
९ |
विकास गंगा समाजसेवी संस्था
नेहरुनगर,खंदारे लेआऊट,घाटंजी,जि.यवतमाळ-४४५ ३०१. |
(T) 07230-202383
(M) 9423331480 (E) info@vikasganga.org (W) www.vikasganga.org |
१० |
कृषि विकास व ग्रामीण प्रशिक्षण समाज संस्था
तळणी,ता.मोटाळा,जि.बुलडाणा |
(T) 07267-245859
(M) 9545755200 |
११ |
मे.ऑक्सीफार्म हॉर्टिकल्चर अॅन्ड अॅग्रीकल्च
टेक्नोलॉजिज, १ ला मजला मनकर्निका कॉम्प्लेक्स,लासलगांव,जि.नाशिक-४२२ ३०६ |
(M) 99214153567, 9822274059 (E) oxyfarm101@gmail.com |
१२ |
विप्रा अॅग्रो बिझीनेस डेव्हलपमेंट सर्व्हीसेस,
३१,राधाई गुरुराज सोसा.पौड रोड,कोथरुड,पुणे-४११ ०२९. |
(T) 020-25463249
(M) 09822378250, 09623395605 (E) vipra_abds@yahoo.co.in |
१३ |
जुगल एस.बाहेती अॅन्ड कं.सनदी लेखापाल,
२ रा मजला,मुकवार कॉम्प्लेक्स,लोखंड लेन,लातूर-४१३५१२ |
(T) 02382-255608ªÉ(M) 09422242414
(F) 02382-250608 (E) jugal_baheti@rediffmail.com |
१४ |
आनंद आर नहार अॅन्ड असोसिएटस,
सी-६,बालाजी अपार्टमेंट,हॉटेल कोहिनूर प्लाझा मागे,निराळा बझार,औरंगाबाद. |
(T) 0240-2345597 (E) anandrnahar@gmail.com |
१५ |
सुविन अॅडव्हायझर्स प्रा.लि.
अे-१६,७ वा मजला,अॅम्फोटेक,एमआयडीसीसमोर,
वरदान बिल्डींग(जुने पासपोर्ट ऑफीस),
वागळे इस्टेट,ठाणे (प.) ४०० ६०४. |
(T) 022-67220000ªÉ(F) 022-67220001 (E) vipin@suvinindia.com, info@suvinindia.com |
१६ |
दिलासा जनविकास प्रतिष्ठाण
बी-३,सुदर्शन पार्क,वेदान्त नगर,
औरंगाबाद-४३१ ००५. |
(T) 0240-2363741, 2320444, 2351456
(M) 09822059883, 9822097264
(F) 0240-2363741 (E) dilasango@gmail.com (W) www.dilasango.org |
१७ |
VAMU अॅन्ड असोशिएटस, सनदी लेखापाल
डी-१,कल्पतरु हौसींग सोसायटी,स्टेट बँक ऑफ पतियाळा मागे,गारखेडा,पुडलिकनगरएरोड,औरंगाबाद-४३१ ००१. |
(M) 9049368567 (E) officemjkadam@gmail.com |
१८ |
एम.एस.झंवर अॅन्ड कं. सनदी लेखापाल
बी-१०८,मंगल आरंभ,कोरा केंद्र हॉल, एस.व्ही.रोड,बोरीवली(प.) मुंबई |
(T) 020-65720545, 64002642
(M) 09920688003, 09970392450 (E) madhus_jhawar@yahoo.com, tulsyan.sachin@gmail.com |
१९ |
आशिश हेडा अॅन्ड असोशिएटस,सनदी लेखापाल
एम-०९,एमआयडीसी ग्रोथ सेंटर,कुंभारी रोड,
अकोला-४४४ १०४. |
(T) 0724-2259100, 2259500, 2259600
(M) 9422959700, 9422959101 (E) hedaashish123@gmail.com |
२० |
दरशॉव कंपनी प्रा.लि.
अे-२३८, २ रा मजला,डिफेन्स कॉलनी,नवी दिल्ली-११००२४. |
(T) 46008585
(M) 9891372538, 9999227847
(F) 24333401 (E) naveen-misra@darashaw.com (W) www.darashaw.com |
२१ |
जयेश देसाळे अॅन्ड कं.सनदी लेखापाल
प्लॅट नं.१२,प्रोफेशनलआर्केड,श्रीसुविधीनाथ को-ऑप.सोसायटी,फायर ब्रिगेडसमोर,शिंगाडा तलाव,नाशिक-४२२००१ |
(T) 0253-2503186
(M) 9890195818
(E) jayeshdesale2006@gmail.com (W) www.jayeshdesaleandco.com |
२२ |
अशा व्हेंचर्स प्रा.लि.
ज्युपिटर शॉप,१० (मिझामाईन)कॉसमॉस रिजेन्सी,
वाघबिल रोड,कवेसर घोडबंदर रोड,ठाणे(प.)४००६०७ |
(T) 022-25975009 (E) info@avplcoldchain.com |
२३ |
नीलकंठ उकारडु कुरकुरे,
२०२,सायली हेरिटेज,गायकवाडनगर,औंध,पुणे-७. |
(T) 020-25898859(M) 9422355411 (E) nukurkure@gmail.com, jukurkure@yahoo.com (W) www.livestock-poultry-financing.blogspot.com |
२४ |
संजीव कोठाडिया प्रतिक दोशी अॅन्ड कंपनी
सनदी लेखापाल,सिताराम निवास,तेजस पॅलेसजवळ,बँक ऑफ बरोडा मागे,भिगवनरोड,
बारामती,जि.पुणे-४१३ १०२. |
(T) 02112-223737
(M) 9860673886
(F) 02112-223737 (E) caskpd@gmail.com |
२५ |
एसएमजी अॅन्ड कं.सनदी लेखापाल
अे-३,आशिर्वाद अपार्टमेंटस,लागू बंधू मोतीवाले समोर,
गरुडा हॉटेल मागे,कर्वेरोड,पुणे-४११ ००४ |
(T) 020-25439160, 25420166 (E) rahul@smgandco.com |
२६ |
अॅडव्हान्स अॅग्रो राईप प्रा.लि.
४०२,अश्िवनी बिल्डींग,सुविधा अंबर,झील कॉलेजसमोर
धायरी न-हे रोड,पुणे-४११ ०४१ |
(T) 020-60121967
(M) 9226115747, 9225137161 (E) sunilbhat1@hotmail.com, info@agroripe.com (W) www.agroripe.com |
२७ |
उल्हास बोरसे अॅन्ड कं. सनदी लेखापाल
प्लॅट नं.१२,सुविधीनाथ को.ऑ.हौ.सो.
फायर ब्रिगेडस्टेशन समोर,शिंगाडा,तलाव,नाशिक-४२२ ००१. |
(T) Tel No. 0253-2503186
(M) 9960050101 (E) caulhasborse_nsk@radiffmail.com, bdc.nsk@gmail.com |
२८ |
एच के बिझनेस कन्सल्टींग प्रा.लि.
सनदी लेखापाल,१ ला मजला,श्रीनिवास अळशी प्लॉटस,अकोला-४४४ ००१. |
(T) 0724-2436858
(M) 9422154880 |
२९ |
एस.टी.मोरे,
बी-५०२,गलोरे पार्क,मराठा मंदिर मागे,बावधन,
पुणे-४११ ०२३१ |
(M) 9822137481 |
३० |
एसएसएएएम अॅन्ड कंपनी,
सनदी लेखापाल,प्लॅट नं.२०१,दुसरा मजलिा,लोटस रेसिडेन्सी,
प्लॉट नं.५ं.जोशी रेल्वे मुझियम समोर,मारुती शेा रुम जवळ,
कोथरुड,पुणे ४११ ०३८. |
(T) 020-25435347, 02426-233200, 02346-240141
(E) abhayshastrica@gmail.com |
३१ |
जी.टी.बारुरे अॅन्ड असोसिएटस,सनदी लेखापाल
१,पहिला मजला,पाडीले कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेच्या वर
आंबाजोगाई रोड,लातूर-४१३५१२. |
(M) 9158888080
(E) cagtbarure@gmail.com,gtbarure@yahoo.co.in |
३२ |
तांबी अन्ड जयपुरकर
सनदी लेखापाल,मणिबाई गुजराथी हायस्कुल समोर,अंबापेठ,अमरावती-४४४६०१ |
(T) 0721-2577043, 2570810, 2567055
(E) v_n_tambi@rediffmail.com |
३३ |
आर.एस.बस्ते अॅन्ड कं.सनदी लेखापाल
४,पहिला मजला,गजानन हाईटस,ओल्ड पंडित कॉलनी
,नाशिक-४२२ ००२ |
|
३४ |
अश्वलिंग अॅग्रो फायनान्शीयल कन्सलटंटस,
४,पहिला मजला,गजानन हाईटस,जुनी पंडीत कॉलनी,
नाशिक-४२२ ००२. |
(M) 7350882020
(E) bhausaheb.pawar@thistle.co.in, bdp.divinity@gmail.com |
३५ |
मे.वेताळ अॅग्रो फायनान्शियल कन्सलटंटस
हाऊस ऑफ राजेश रावा,ज्ञानदीप कॉलनी
नं.१ कर्वेनगर,पुणे -४११ ०५२. |
(M) 8805711700
(E) rcvetal@gmail.com, rameshvetal@yahoo.co.in |
३६ |
तेजस के जैन अॅन्ड असोसिएटस,
सनदी लेखापालएशॉप नं.१९,पहिला मजला,शेतकी संघ कॉम्पलेक्स,पोलिस चौकीजवळ,चोपडा-४२५१०७. |
|
३७ |
नहार जैन असोसिएटस,
सनदी लेखापाल,हिराला चौक,बीड- ४३१ १२२. |
(T) 02442-225229ªÉ(M) 09270008800
(E) caadesh@gmail.com
(W) www.caadesh.yolasite.com |
३८ |
केव्हीएमडीएस अॅन्ड असोसिएटस,सनदी लेखापाल,
बी-१०१,स्नेथ गंगा, बी विंग,शंकरशेठरोड,
वेगा सेंटरजवळ,स्वारगेट,पुणे-४११ ०३७ |
(T) 020-24445002M) 9270008800
(F) 020-24445003
(E) ca.grs.pune@gmail.com, clients@kvmds.org
(W) www.caadesh.yolasite.com |
३९ |
एस.जी.अंदानी आणि कंपनी सनदी लेखापाल
,ब्राम्हण गल्ली,माळीवाडा,अहमदनगर-४१४ ००१. |
(T) 0241-2327994
(M) 9226317556
(E) omsaisidhi@gmail.com |
४० |
निहार कन्सल्टंशी अॅन्ड सर्व्हीसेस
सनदी लेखापाल,एस-३,शशी प्लाझा,शाहुपरी ३री गल्ली,
कोल्हापुर-४१६ ००७. |
(T) 0231 - 2658905
(M) 8149681963
(E) nphargude@gmail.com
(W) www.niharcs.com |
४१ |
प्रविण धीरन अॅन्ड कंपनी
सनदी लेखापाल,मनिष सदन,रमन सायकल इंडस्ट्रीज,कृष्णनगर,वर्धा- ४४२००१ |
(T) 07152-242724
(M) 09823592016
(F) 07152-245678
(E) pravin_dhiran@rediffmail.com |
४२ |
संजय एन पवार अॅन्ड असोशिएटस,
सनदी लेखापाल,स.न. ३७/२क मोदी मॅन्शन,१ला मजला,सेवन लव्हज चौक,मार्केटयार्ड रोड, पुणे-४११ ०३७. |
(T) 020-24452123/32512123
(M) 9921231234
|
४३ |
एस.आर.जाजू अॅन्ड कंपनी
सनदी लेखापाल,सिव्हील लाईन्स,अकोला-४४४ ००१ |
(T) 0724-2415255
(M) 9822731423, 9422164721
(E) bhushanjajoo@yahoo.com |
४४ |
अॅग्रोव्हिजन फार्मर प्रोडयुसर कंपनी लि.
पहिला मजला,ब्लॉक नं.२,कडबा मार्केटयार्ड,
अहमदनगर- ४१४००१. |
(T) 0241-2344111
(M) 9850647444, 9822252225
(E) vaibhav.dhasal@gmail.com
(W) www.agrovisionahmednagar.org |
४५ |
संजय मधराणी अॅन्ड असोसिएटस,
३०२,स्टील चेंबर,जैन मंदिरासमोर,भंडारा रोड,वर्धमाननगर,
नागपूर-४४०००८. |
(T) 0712-2682920, 2681516
(M) 09325632715
(E) smadhrani@gmail.com
|