(महाराष्टृ राज्यामध्ये फळांच्या रोपमळंयाना अनुज्ञपित देण्याची व त्याचें नियमन करण्याची तरतुद करण्यासाठी अधिनियम)
ज्या अर्थी महाराष्ट्र राज्यात फळांच्या रोपमळयांना अनुज्ञपित देणे व त्याचें नियमन करणेतसेच तत्संबधित बाबीसाठी तरतुद करणे इष्ट आहे, त्याअर्थी भारतीय गणराज्यांच्या विसाव्या वर्षी, याद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे :-
१. व्याप्ति व प्रांरभ :-
- (१) या अधिनियमास महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम १९६९ असे म्हणता येईल.
- (२) तो संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लागु असेल.
- (३) राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसुचनाव्दारे नियुक्त करील अशा तारखेस तो अंमलात येईल.
२. व्याख्या :-संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर या अधिनियमात-
- (अ) 'सक्षम अधिकारी' म्हणजे कलम ३ अन्वये नेमण्यात आलेले सक्षम अधिकारी.
- (ब) 'फळांचा रोपमळा' म्हणजे ज्या ठिकाणी नित्याचा व्यवसाय म्हणुन फळांच्या रोपांची पैदास करण्यात येते आणि प्रतिरोपणासाठी त्यांची विक्री करण्यात येते असे कोणतेही ठिकाण पंरतु त्यात शासनाच्या मालकीच्या किंवा शासनाकडुन व्यवस्था ठेवण्यात येणा-या फळांच्या रोपमळयांचा समावेश होणार नाही.
- (क) 'फळांचे रोप' म्हणजे खाद्य फळे किंवा कवचधारी फळे देणारे कोणतही रोप आणि त्यात डोळे असलेली फांदी,बीजरोप कलमे, दाबकलमे, बी कंद शोषक कंडे, आणि अशा कोणत्याही रोपांची छाट कलमे यांचा समावेश असेल.
- (ङ) फळांच्या रोपमळयांच्यां संबधात 'मालक' म्हणजे अशा फळांच्या कारभारावर जिचे किंवा ज्याचे अंतिम नियंत्रण असेल अशी व्यक्ती किंवा असे प्राधिकरण आणि उक्त कारभार व्यवस्थापक, व्यवस्थापन संचालक किंवा व्यवस्थापन अभिकर्ता याकडे सोपविण्यात आला असेल त्या बाबतीत व्यवस्थापक, व्यवस्थपन संचालक किंवा व्यवस्थापन अभिकर्ता फळांचा रोपमळयांचा मालक असल्याचे मानण्यात येईल.
- (इ) 'विहित' म्हणजे या अधिनियमाखालील नियमाव्दारे विहित.
- (फ) 'मुलकांड' म्हणजे ज्याच्यावर फळाच्या रोपाच्या कोणत्याही भागाचे कलम केले असेल किंवा ज्याचा डोळा भरण्यात आला असेल असे फळांचे रोप किंवा त्याचा भाग.
- (ग) 'कलम' म्हणजे मुलकांडावर ज्याचे कलम करण्यात आले असेल किंवा ज्याने मुलकांडाच्या डोळा भरण्यात आला असेल अशा फळाच्यां रोपांचा भाग.
३. सक्षम अधिका-यांची नियुक्ती :-
राज्य शासनास शासकीय राजपत्रातील अधिसुचनाद्वारे-
- (अ) त्यास योग्य वाटतील अशा शासनाचे राजपत्रीत अधिकारी असणा-या व्यक्तीची याअधिनियमाच्या प्रयोजनासाठी सक्षम अधिकारी म्हणुन नियुक्ती करता येईल. आणि
- (ब) ज्या क्षेत्र मर्यादेत या अधिनियमाव्दारे किंवा तदन्वये सक्षम प्राधिक-यास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा तो वापर करु शकेल आणि सोपविलेली कर्तव्ये पार पाडुशकेल ती क्षेत्र मर्यादा निर्धारीत करता येईल.
४. प्रत्येक फळांच्या रोपमळयांच्या मालकाने लायसन घेणे:
फळांच्या रोपमळयाचा कोणताहीमालक या अधिनियमाच्या प्रांरभाची तारीख किंवा तो ज्या तारखेस अशा रोपमळयाचा मालकहोईल. ती तारीख यापैकी जी नतंरची असेल अशा तारखेपासुन सहा महिने संपल्यानंतर याअधिनियमाच्या आणि त्याखाली करण्यात आलेल्या नियमाच्या उपबंधान्वये त्याने घेतलेल्या लायसन अन्वये आणि त्यास अनुसरुन असेल त्याखेरीज फळांच्या रोपमळयाचा धंदा चालविणार नाही किंवा करणार नाही.
स्पष्टीकरण : एखाद्या मालकाचे फळाचे एकापेक्षा अधिक रोपमुळे असतील मग ते त्यास नगरात किंवा गावात असोत अगर निरनिराळया नगरामध्ये किंवा गावामध्ये असोत. तेव्हा तोफळांच्या अशा प्रत्येक रोपमळयासाठी वेगवेगळी लायसन घेईल.
५. लायसनच्या मंजुरीसाठी व त्याचे नवीकरण करण्याकरिता अर्ज :
६. लायसनधारकाची कर्तव्ये :
या अधिनियमाखालील प्रत्येक लायनसधारकास
- (अ) सक्षम प्राधिका-याकडुन निदेग्शित करण्यात येईल त्याप्रमाणे कलम किंवा मुलकांड यांच्या संबंधात पैदाशीकरिता किंवा विक्रीकरिता लायसनमध्ये निर्दिष्ट्र केलेल्या फळांच्या रोपांच्या प्रकारांचे केवळ वापर करण्याची हमी देईल.
- (ब) प्रत्येक मुलकांड व प्रत्येक प्रत्येक कलम यांचा उगम किंवा उत्पती या बद्दलची संर्पुण माहिती ठेवील व तीन पुढील गोष्टी दर्शविण्यात येतील.
- (एक) वापरण्यात आलेल्या मुलकांडाचे कोणतेही स्थानिक नाव असेल तर त्यासह त्याचे वनस्पतीशास्त्रातील नांव
- (दोन) फळांची रोपे वाढविताना वापरलेल्या कलमाचे कोणतेही स्थानिक नाव असेल तर त्यासह त्याचे वनस्पतीशास्त्रातील नावं.
- (क) फळांची रोपे वाढविताना वापरण्यात आलेल्श प्रत्येक मुलकांडाच्या आणि कलमाच्या झाडाची जागा दर्शविणारा आराखडा ठेवील.
- (ड) रोपांचे वाफे तसेच फळांच्या पैदासाठी वापरण्यात आलेली जनक झाडे विनाशी किटक व वनस्पती रोग यापासुन मुक्त ठेवील.
- (ई) सक्षम प्राधिका-याकडुन निदेश देण्यात येतील अशा रीतीने फळांची रोपे तयार करण्याची हमी देईल.
- (फ) विक्रीचा उद्देश असलेल्या कोणत्याही पुउक्यात बंद केलेल्या फळांच्या रोपाच्या प्रत्येक प्रकाराचे नांव विहित रीतीने ठरविण्यात आलेले त्याचे वय आणि अशा प्रत्येक फळांच्या रोपांच्या कलमांच्या नांवासह मुलकांडाचे नांव ठळक रीतीने खुण चिठीवर विनिर्दिष्ट करील.
- (ग) कोणत्याही प्रकाराची विनाशी किटक किवा वनस्पती रोग या पासुन संपुर्णपणे मूक्तअसतील अशीच फळांची रोपे विक्रीसाठी व वाटपासाठी देण्यात येतील याची हमी देईल.
- (ह) कोणत्याही व्यक्तीला विकलेल्लया फळांच्या रोपांचे नांव त्याचे रोपांचे वय मुलकांड आणि कलम याचे नांव आणि ते खरेदी करणा-या व्यक्तीचे नांव व पत्ता दर्शविणारी एक नोंदवही सक्षम प्राधिका-याकडुन विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा नमुन्यात ठेवील.
७. विवक्षित फंळाच्या रोंपाची आयात निर्यात किंवा परिवहन याचें नियमन करण्याची किंवा मनाई करण्याची राज्य सरकारची शक्ती :
राज्याच्या कोणत्याही भागात पैदास करण्यात येणा-या फळांच्या रोपांचा दर्जा टिकविण्याच्या किंवा त्याचें हानिकारक विनाशी किटकांपासुनकिंवा रोगापसुन संरक्षण करण्याच्या प्रयोजनाकरिता राज्य शासनास शासकीय राजपत्रातील अधिसुचनाद्वारे राज्य शासन घालील अशा निर्बंधास आणि शर्तीस अधिन राहुन अज्ञात अभिजातीच्या कोणत्याही फळांचे रोप किंवा कोणत्याही संक्रामक किंवा सांसर्गिक किड किंवारोग याची बाधा झालेल्या फळांचे रोप केंद्र सरकारने निर्धारीत केल्याप्रमाणे सीमाशुल्क सरहद्दीदीवर नेआण वगळता राज्यात किंवा त्याच्या कोणत्याही भागात आणणे किंवा त्यामधुन ते बाहेर नेणे किंवा राज्यातील त्याचे परिवहन करणे याचें नियमन करता येइल किंवा त्यास मनाई करता येईल.
८. लायसन रद्द करण्याची किंवा निलंबित करण्याची शक्ती:
९. लायसन परत करणे :
लायसनमध्ये विनिर्दिष्ट केलेला विधिग्राहयतेचा कालावधी संपल्यानंतर किंवा लायसन निलंबित केल्याचा किंवा रद्द केल्याचा आदेश मिळाल्यानतंर लायसनधारक तो लायसन सक्षम प्राधिका-याकडे परत करील.
परंतु (लायसन) समाप्त करण्यात निलंबित करण्यात किंवा रद्द करण्यात आल्या नंतर असासक्षम अधिकारी मालकाला आपल्या फळांच्या रोपमळयाचें समापन करणे शक्य व्हावे या साठी त्याला योग्य वाटेल इतका वेळ त्यास देईल.
१०. लायसनची दुसरी प्रत :
मालकाला दिलेला लायसन हरवला असेल नष्ट झाला असले जीर्णर्शीण झाला असेल तर सक्षम अधिकारी अर्ज केल्यावर आणि विहित केलली फी दिल्यावर लायसनची दुसरी प्रत देईल.
११. अपिले :
(१) लायसन देण्यास किंवा त्याचे नविकरण करण्यास नकार देणा-या किंवा तो निलबित किंवा रद्द करणा-या सक्षम अधिका-याच्या आदेशामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असे समजणा-या कोणत्याही व्यक्तीस विहित करण्यात येईल अशा नमुन्यात आणि अशा रीतीने अशा कालावधीत आणि अशा प्राधिक-याकडे अपील करता येईल.
पंरतु अपीलदारास वेळेवर अपील दाखल करण्यास पुरेशा वेळ कारणामुळे प्रतिबंध झाला या बद्दल अपील प्राधिक-याची खात्री झाली तर अपील प्रधिका-यास विहित कालावधी संपल्यानतंर अर्ज स्विकारता येईल.
- (२) पोटकलम (१) खालील अपील मिळाल्यानंतर अपील अधिकारी प्राधिकारी अपीलदारास आपली बाजु मांडण्याची वाजवी संधी दिल्यानंतर अपीलावर त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे आदेश देईल.
- (३)या कलमान्वये देण्यात आलेला आदेश पुढील अनुवर्ती कलमाच्या उपबंधाना अधिन राहुन अतिंम असेल.
१२. पुनरीक्षण :
(१) राज्य शासन स्वाधिकारे क्रिवा आपल्यावर अन्याय झाला आहे असे समजणा-या व्यक्तीने त्याच्याकडे केलेल्या अर्जावरुन कोणत्याही वेळी या अधिनियमान्वये देण्यात आलेल्या कोणत्याही आदेशाचा कायदेशीर किंवा औचित्य याबद्दल स्वतःची खात्री करुन घेण्याच्या प्रयोजनाकरीता कोणत्याही प्रकरणाचे अभिलेख मागविता येतील आणि तपासणी करता येईल आणि त्यास योग्य वाटेल असा आदेश त्यावर देता येईल.
परंतु ज्या आदेशाविरुद्ध निकट पुर्वीच्या कलमान्वये दाखल करण्यात आलेले अपील प्रलंबितअसले त्या आदेशाच्या संबंधात किंवा अपीलासाठी असलेली कालमर्यादा संपण्यापुर्वी दाखल करण्यात आले त्या अर्जाच्या बाबतीत राज्य शासन या कलमान्वये त्यास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करणार नाही.
तसेच राज्य शासन या कलमाखाली ज्या कोणत्याही आदेशामुळे ज्या कोणत्याही व्यक्तीवरप्रतिकुल परिणाम होत असले त्या व्यक्तीस आपली बाजु मांडण्याची वाजवी देण्यात आल्या खरीज असा आदेश देणार नाही.
- (२) या कलमान्वये देण्यात आलेल्या आदेश अंतिम असेल.
१३. प्रवेश करण्याची व निरीक्षण करण्याची शक्ती :
(१) कोणत्याही फळरोपमळयाच्या स्थितीबद्दल खात्री करुन घेण्याची प्रयोजनार्थ किवा त्याच्या कामाची तपासणी करण्याच्या प्रयोजनार्थ किंवा अधिनियमात किंवा त्या अन्वये करण्यात आलेल्या नियमात उल्लेखिलेल्या इतर कोणत्याही प्रयोजनार्थ सक्षम अधिका-यास किंवा त्याने किंवा राज्य शासनाने या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीस सर्व वाजवी वेळामध्ये सहायकसह किंवा सहायकाशिवाय.
- (अ) फळाच्या कोणत्याही रोपमळयात प्रवेश करण्याचा आणि त्यामधील फळांच्या रोपाचें निरिक्षण किंवा तपासणी करण्याचा.
- (ब) अशा रोपमळयांसंबधी कोणतेही हिशोबाची पुस्तके नोंदणी पुस्तके अभिलेख किंवा इतर लेख सादर करण्याबद्दल आदेश देण्याचा आणि त्यामधुन उतारे किंवा लेखाच्या प्रती घेण्याच्या किंवा घेवविण्याचा.
- (क) आवश्यक ते सर्व प्रश्न विचारण्याचा आणि अशा रोपमळयावर नियंत्रण असणा-या किंवा त्यासंबंधात कामावर ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीची तपासणी करण्याचा अधिकार असेल.
(२) लायसनधारक आणि रोपमळयाच्या संबंधात कामावर ठेवलेल्या सर्व व्यक्ती सक्षम अधिकारी किंवा प्राधिकृत व्यक्ती यास उपरोक्त प्रयोजनार्थ आवश्यक असेल त्याप्रमाणे अशा निरिक्षणासाठी व तपासणीसाठी वाजवी प्रवेश करु देतील व सर्व वाजवी सोयी उपलब्ध करुन देतील आणि आपल्या माहितीनुसार व विश्र्वासानुसार सर्व प्रश्नाचीं उत्तरे आपल्या कब्जातील लेख सादर करणे आणि अशा प्राधिक-यास किंवा व्यक्तीस आवश्यक वाटेल अशी फळांच्या रोपमळयासंबंधीची इतर माहिती देणे त्यांना बंधनकारक असेल.
१४. शास्ती :
कोणतेही व्यक्ती-
- (अ) या कलमान्चवये शिक्षापात्र ठरविण्यात आलेल्या या या अधिनियमाच्या किवा त्या अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाच्या कोणत्याही उपबंधावे उल्लघंन करीत किंवा
- (ब) या अधिनियमान्वये किंवा तदन्वये कोणत्याही अधिका-यास किंवा व्यक्तीस प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा तो वापर करीत असताना किंवा तिच्यावर सोपविण्यात आलेले कोणतेही कर्तव्य बजावीत असताना त्यास अडथळा करील तर त्या व्यक्तीस दोषसिद्धीनंतर एक हजार रुपयांच्या मर्यादेपर्यन्त दंडाची शिक्षा देण्यात येईल.
१५. कंपन्यानी केलेले अपराध :
(१) या अधिनियमाखाली अपराध एखादया कंपनीचे केला असेल त्यस बाबतीत अपराध घडल्याच्या वेळी कंपनीचा धंदा चालविण्यासाठी कंपनी ज्या व्यक्तीच्या स्वाधीन होती आणि जी व्यक्ती तिला जबाबदार होती ती प्रत्येक व्यक्ती त्याचप्रमाणे कंपनी ही आपराधा बद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्याप्रमाणे ती तिजविरुद्ध खटला केला जाण्यास व शिक्षा केली जाण्यास पात्र राहील.
परंतु, कोणतीही व्यक्ती असा अपराध तिच्या नकळत झाला आहे.किंवा असा अपराध होवु नये म्हणुन तिनक सर्व वाजवी दक्षता घेतली होती असे सिद्ध करील तर ती या पोटकलमातील कोणत्याही गोष्टीमुंळे या अधिनियमात उपबंधित कोणत्याही शिक्षेस पात्र ठरणार नाही.
- (२) पोटकलम (१)मध्ये काहीही अंतर्भुत असले तरी एखादया कंपनीने या अधिनियमाखालील एखादा अपराध केलेला असेल व तो अपराध कंपनीच्या कोणत्याही संचालकाच्या व्यवस्थापकाच्या,सचिवाच्या क्रिवा इतर अधिक-याच्या संमतीने किंवा त्याने कानाडोळा केल्यामुळे किंवा त्याच्याकडुन झालेल्या कोणत्याही हयगयीमुळे घडलेला आहे असे सिद्ध होईल त्या बाबतीत असा संचालक व्यवस्थापक सचिव किंवा इतर अधिकारी हा सुध्दा त्या अपराधाबद्दल दोषी आहे असे मानले जाईल आणि त्यानुसार त्याच्याविरुद्ध खटला केला जाण्यास व शिक्षा केली जाण्यास तो पात्र ठरेल.
स्पष्टीकरण : या कलमाच्या प्रयोजनार्थ :
- (अ) कपनी म्हणजे कोणताही निगम निकाय आणि त्यात एखादया भागीदारी संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या इतर संघाचा समावेश होतो.
- (ब) एखादया भागीदारी संस्थेच्या संबंधात संचालक म्हणजे भागीदारी संस्थेतील एखादा भागीदार.
१६. अपराधाची दखल घेणे :
सक्षम प्राधिक-याने किंवा या बाबतीत राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिका-याने या अधिनियमान्वये शिक्षा पात्र असलेला अपराध ज्यात तथ्यांचा मिळुन बनला असेल त्या तथ्याविषयी लेखी प्रतिवेदने केले असेल त्या व्यक्तीरिक्त कोणतेही न्यायलय अशा अपराधाची दखल घेणार नाही.
१७. न्यायलयाची अधिकारिता :
इलाखा शहर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्गाचा दंडाधिकारी यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेले कोणतेही न्यायालय या अधिनियामान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची न्याय चौकशी करणार नाही.
१८. या अधिनियमान्वये शक्तीचा वापर करणारे अधिकारी व व्यकती हे लोकसेवक असतील :
या अधिनियमान्वये नियुक्त केलेले सर्व अधिकारी आणि या अधिनियमाद्वारे किवा तदन्वये तिला प्रदान केलेल्या कोणत्याही शक्तीचा वापर करण्यासाठी व तिच्यावर सोपविलेली कोणतीही कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्राधिकृत केलेली प्रत्येक व्यक्ती ही भारतीय दंड संहितेच्या कलम २१ च्या अर्थानुसार लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.
१९. सद्दभावनापुर्वक केलेल्या कार्यवाहीचे संरक्षण :
हा अधिनियम किंवा तदन्वये केलेले कोणतेही नियम यानुसार सदभावनापुर्वक केलेल्या किंवा करण्याच्या इरादा असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल राज्य शासन किंवा कोणतेही अधिकारी किंवा व्यक्ती याच्याविरुद्ध कोणताही दावा अभियोग किंवा इतर वैध कार्यवाही करता येणार नाही.
२०. प्रत्यायोजन करावयाची शक्ती :
राज्य शासन शासकीय राजपत्रातील अधिसुचनेद्वारे असा निदेश देऊ शकेल की या अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये केलेल्या कोणत्याही नियमाद्वारे राज्य शासनास प्रदान केलेल्या कोणत्याही शक्ती (नियम करण्याची शक्ती वगळता किंवा त्याच्यावर सोपलेले कर्तव्य अधिसुचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा परिरिथतीत व व अशा शर्तीस कोणत्याही असल्यास अधिन राहन राज्य शासनास अधिन असलेल्या कोणत्याही अधिक-यास किंवा प्राधिकरणास वापरता यंईल किंवा पार पाडता येईल.
२१. नियम :
(१) राज्य शसनास शासकीय राजपत्रातील अधिसुचनाद्वारे व पुर्व प्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहुन या अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी नियम करता येतील.
(२)विशेषतः व पुर्वगामी शक्तीच्या सर्वसाधारणेला हानी न पोचवता अशा नियमात खालील सर्व बाबीसाठी खालील तरतुद करता येईल.
- (अ) लायसनसाठी करावयाच्या अर्जाचा नमुना व रीत अशा लायसनसाठी व त्याच्या नवीनकरणासाठी द्यावयाची फी कलम ५ अन्वये ज्या मुदतीसाठी ज्या शर्तीच्या अधीन ज्या नमुन्यात लायसन देता येईल ती मुदत त्या शर्ती व तो नमुना
- (ब) लायसनधारीने ज्याचे उल्लंघन केल्याने कलम ७ अन्वये लायान निलंबित करणे किंवा रद्द करणे भाग पडेल ती इतर कारणे.
- (क)कलम १० अन्वये लायसनच्या दुस-या प्रतीच्या संबंधात देय असलेली फी.
- (ड) कलम ११ अन्वये ज्या नमुन्यात व ज्या रीतीने ज्या मुदतीत आणि ज्या प्राधिका-याकडे अपील करता येईल तो नमुना व ती रीत व ती मुदत व तो प्राधिकार आणि अपील निकालात काढताना अपील प्राधिका-याने अनुसरावयाची कार्यपद्धती.
- (इ) विहित करावयाची असेल किंवा विहित करता येईल अशी कोणतीही इतर बाब.
(३) या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमात त्याचे उल्लघंन कलम १४ अन्वये शिक्षा पात्र ठरेल अशी तरतुद करता येईल.
(४)ह्या कलमान्वये करण्यात आलेला प्रत्येक नियम तो करण्यात आल्यानतंर शक्य असेल तितक्या लवकर राज्स विधानमंडळाचे अधिवेशन चालु असताना एकाच अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन अधिवेशानात एकुण तीस दिवसांची होईल इतक्या मुदतीकरिता राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुडे ठेवण्यात येईल आणि ज्या अधिवेशानात तो अशा रीतीने ठेवण्यात आला असेल ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापुर्वी त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे कबुल होतील किंवा नियम करु नये म्हणुन दोन्ही सभागृहे कबुल होतील व असा निर्णय शासकीय राजपत्रात अधिसुचित करतील तर अशा अधिसुचनेच्या तारखेपासुन यथास्थिती अशा फेरबदल केलल्या स्वरुपातच तो नियम अंमलात येईल किंवा तो अंमलात येणार नाही तथापी असे कोणतेही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या नियमान्वये पुर्वी केलेल्या किंवा करण्याचे राहुन गेलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राहेतेस बाध येणार नाही.
महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियमन १९६९ (सन १९६९ चा महाराष्ट्र ४५)याच्या कलम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन याद्वारे-
- (अ) महाराष्ट्र राज्यामध्ये (बृहन्मुंबई) प्रत्येक जिल्हयातील सहायक कृषि संचालक याची या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे आणि.
- (ब) तो ज्या अधिकारीतेच्या हद्दीत उक्त अधिनियमाद्वारे किंवा तदन्वये सक्षम प्राधिका-यास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करील व त्यावर लादण्यात आ लेली कर्तव्ये पार पाडील अशा जिल्ह्यातील त्यांच्या अनुक्रमे अधिकारिजेच्या हद्दी निश्चित करीत आहे.
महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियमन १९६९( सन १९६९ चा महाराष्ट्र ४५) याच्या कलम १ पोटकलम (३) द्वारे प्रदान करण्याम आलेल्या शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन द्वारे १ डिसेबंर १९७६ ही तारीख उक्त अधिनियम ज्या तारखेस अंमलात येईल ती तारीख म्हणुन नेमुन देत आहे.
महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) नियम १९७६
महाराष्ट्रात फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम १९६९ (सन १९६९ चा महाराष्ट्र ४५) याच्या कलम २१ पोटकलम (२) खेड (अ) (ब) (क) (ड) आणि (इ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा व या बाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणा-या सर्व इतर शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र शासन याव्दारे पुढील नियम करीत आहे. हे नियम उक्त कलम २१ पोट-कलम (१) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे पुर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेतः-
१. नियम- या नियमास महाराष्ट्र फळाचे रोपमळे (नियमन) नियम १९६९ असे म्हणता येईल-
२. व्याख्या- या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर-
- (अ) अधिनियम म्हणजे महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियमन १९६९
- (ब) नमुना म्हणजे या नियमास जोडण्यात आलेला नमुना
- (क) कलम म्हणजे अधिनियमाचे कलम.
३. अर्जाचे आणि लायसनचे नमुने व त्यासाठी असलेली फी --
- (१) कलम ४ अन्वये लायसन घेऊ इच्छिणारा फळांच्या रोपमळायांचा कोणताही मालक अशा प्रत्येक रोपमळयाच्या संबंधात १० रुपयांच्या लायसन फीसह अशा प्रत्यके रोतळयाच्या संबंधात (सक्षम प्राधिक-याकडे) नमुना अ मध्ये अर्ज करु.
- (२) कलम ५ अन्वये देण्यात आलेले लायसन नमुना 'ब' मध्ये असेल.
४. लायसन इत्यादी यांची विधिग्राह्यता :-
- (१) कलम ८ च्या उबंधास अधिन राहुन प्रत्येक लायसन पाच वर्षाच्या मुदतीसाठी अंमलात राहील. आणि १० रुपयाच्यां नवीकरण फीसह नमुना क मध्ये सक्षम प्राधिका-याकडे अर्ज करुन त्याचे नवीकरण करता येईल.
- (२) पोटनियम १ अन्वये अर्ज मिळाल्यानंतर सक्षम प्राधिकारी रोपमळयाची तपासणी करील किंवा तपासणी करण्याची व्यवस्था करील आणि अशी तपासणी केल्यानंतर किंवा तपासणीचाअहवाल कोणताही असल्यास विचारात घेतल्यानंतर पाच वर्षाच्या मुदतीसाठी लायसनचे नवीकरण करील.
५. आकारले जाणारे दर प्रदर्शित करणे :-
फळांच्या रोपमळयाचा प्रत्येक मालक तो विक्री करत असलेल्या रोपमळयाच्या प्रत्येक रोपासाठी तो आकारीत असलेले दर त्याच्या रोपमळयातील प्रमुख किंवा ठळक ठिकाणी प्रदर्शित करील.
६. नोंदवहया :-
अधिनियमाचे लायसन धारण करणारा फळांच्या रोपमळयाच्या प्रत्येक मालक लायसनची मुदत चालु असताना--
- (अ) फळाचे रोप आणि त्याची जात दर्शविणारी नोंदवही आणि फळाचे रोप वाढविताना वापरण्यात आलेल्या प्रत्येक मुलकांडाच्या आणि कलमाच्या सायन झाडांची जागा दर्शविणारी आराखडा नमुना ड मध्ये ठेवील.
- (ब) लायसनधारकाने आपल्या रोपमळयात रोपांची पैदास करण्यासाठी राज्यातील कोणत्याही अन्य रोपमळयातील कोणत्याही रोगापासुन बियाणे घेतलेले असेल त्या बाबतीत नमुना 'इ' मध्ये नोंदवही ठेवील.
- (क) त्याने तयार केलेल्या फळांच्या रोपांच्या संपुर्ण विक्रीचा तपशील दर्शविणारी नोंदवही नमुना 'फ' मध्ये ठेवील.
७. फळाच्या रोपाचे वय निश्चित करण्याची रीत :-
कलम ६ खंड फ च्या प्रयोजनासाठी फळाच्या रोपाचे वय पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येईल :-
- (अ) रोपाच्या बाबतीत बी पेरल्याच्या तारखे पासुन.
- (ब) छाट कलमाच्या बाबतीत छाट कलम रोपमळयातील वाफयात लावल्या तारखे पासुन.
- (क) अंकुरीत किंवा कलमाच्या रोपांच्चा बाबतीत मुलकांड आणि कलम यांची वये वेगवेगळी दर्शविण्यात येतील रोपाच्या बाबतीत ज्याप्रमाणे वय निश्चित करण्यात येते त्याप्रमाणे मुलकांडाचे वय निश्चित करण्यात येइल. आणि कलमाच्या बाबतीत ते कलम केल्याच्या तारखेपासुन वय नियिचत करण्यात येईल.
- (ड) दाब कलमाच्या लेअर्ड प्लॅट बाबतीत दाब कलमाची क्रिया केल्याच्या तारखे पासुन.
८. सक्षम प्राधिका-याकडुन तांत्रिक सुचना :-
फळाच्या रोपांच्या दर्जा चांगला रहावा यासाठी फळांची रोपे कोणत्या रीतीने वाढवावीत या विषयीच्या तांत्रिक सुचना सक्षम प्राधिक-याकडुन लेखी स्वरुपात देण्यात येतील आणि त्या नोंदणीकृत डाकेने लायसनधारकांना कळविण्यात येतील. या सुचना त्या दिल्याची तारीख किंवा पत्रात विनिर्दिष्ट केलेली तारीख यापैकी जी तारख नंतरची असेल त्या तारखेनंतर सहा महिने अंमलात राहतील.
९. लेबलचा नमुना :-
रोपमळयातील रोपावर लावायाचे लेबल खुण चिठी नमुना 'ग' मध्ये असेल.
१०. लायसनच्या दुस-या प्रतीसाठी फी :-
लायसनची दुसरी प्रत देण्याकरीता आकारली जाणारी फी पाच रुपये असेल.
११. अपील :-
- (१) कलम ११ अन्वये सक्षम प्राधिका-यसच्या आदेशाविरुद्ध करावयाचे अपील पोट नियम (२) अन्वये रचना करण्यात आलेल्या अपील प्राधिकरणाकडे सक्षम प्राधिका-याच्या आदेशच्या तारखेपासुन ९० दिवसाच्या आत नमुना 'ह' मध्ये करण्यात येइल.
- (२) अपील प्राधिकरण तीन सदस्याचे मिळुन होईल आणि कृषि संचालक त्याचे अध्यक्ष असतील.
- (३) अध्यक्षा च्या व्यतिरिक्त इतर सदस्य राज्य शासनाकडुन नामनिर्देशित करण्यात येतील आणि ते या नियमाचा प्रारंभ झाल्याच्या तारखेपासुन तीन वर्षाच्या मुदतीसाठी पद धारण करतील.
१२ फळांच्या रोपमळयात प्रवेश करण्याची व त्याची तपासणी करण्याची वेळ :-
सक्षम प्राधिका-यास किंवा त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीनां कलम १३ अन्वये प्रवेश करण्याच्या व तपासणी करण्याच्या शक्तीचा कोणत्याही दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत वापर करता येईल.
१३. शास्ती :-
या नियमातील नियम ४ किंवा ६ यांच्या उपबंधाचे उल्लंघन करील अशी कोणतीही व्यक्ती अधिनियमाच्या कलम १४ अन्वये शिक्षापात्र ठरेल.
नमुना 'अ'
(नियम ३(१) पहा)
महाराष्ट्र फळांचे रोपमळो (नियमन) अधिनियमन १९६९ याच्या कलम ३ खालील
लायसनसाठी द्यावयाचा अर्जाचा नमुना
- (१) रोपमळयाचे नांव :
- (२) मालकाचे नाव आणि पुर्ण पत्ता :
(३) रोपमळयाचे निश्चित ठिकाण :
- (अ) जिल्हा :
- (ब) शहर किंवा गाव :
- (क) नजीकचे रल्वे स्थानक :
(४) जनक रोपासह रोपमळयाचे एकुण क्षेत्र :
त्याच्या भुमापन क्रमांकासह
- (५) अजर्दार रोपमळयाचा व्यवसाय किती काळ करीत आहे?
- तसे असल्यास मागील दोन वर्षात दरवर्षी तयार केलेल्या व विक्री केलेल्या फळांच्या रोपांची संख्या प्रत्येक जातीसाठी वेगळी देण्यात यावी.
- (६) कीटक, कीड आणि वनस्पती रोग याच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध साधनांचा तपशील :
- (७) दिलेल्या लायसन फीचा तपशील :
- (८) प्रतिज्ञापन-
- (अ) मी याद्वारे प्रतिज्ञापन करतो की वर देण्यात आलेली माहीती माझ्या संपुर्ण माहितीनुसार व विश्वासानुसार खरी आहे,
- (ब) मी अधिनियम आणि त्याखाली तयार करण्यात आलेले नियम वाचले असुन वेळोवेळी सुधारणा करण्यात येईल अशा अधिनियमात व नियमात विहित करण्यात आलेल्या सर्व अटी पुर्ण करण्याची हमी देत आहे,
- (क) मी केवळ दर्जेदार रोपे वाजवी किमतीने विकण्याची हमी देत आहे,
- (ड) मी माझ्या रोपमळयात सध्या उपलब्ध नाहीत अशा कलमाची व मुलकांडाची (जनक) रोपे रोप लावण्याच्या पुढील हंगामात लावीन अशी हमी देतो,
-
ठिकाण : अर्जदारची सही
पत्ता ................................................
दिनांक : ................
नमुना 'ब'
(नियम ३ (२) पहा)
- लायसन क्रमांक
- दिल्याची तारीख ................
- पर्यन्त विधिग्राह्य................................
महाराष्ट्र राज्यात पळांच्या रोपमळयाचा धंदा चालविण्यासाठी किंवा करण्यासाठी लायसन,
श्री................................यास महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम १९६९ याच्या उपबंधास अधीन राहुन पुढील अठी व शर्तीवर दिनांक................पासुन राज्यात ................येथे (येथे रोपमळयाची जागा नमुद करावी यात पुढे जिचा निर्देश लायसन दिलेली जागा असा करण्यात आला आहे,) फळांच्या रोपमळयाचा धंदा चालविण्यासाठी किंवा करण्यासाठी याद्वारे लायसन देण्यात येत आहे.
फळाच्या रोपमळयाचे नाव |
फळाच्याचा रोपमळयाची जागा |
फळाच्या रोपमळयाचे एकुण क्षेत्र |
लायसनखाली नेहमीच्या धंद्याच्या ओघात पैदास व विक्री करावयाच्या फळांच्या रोपांचे नाव व प्रकार |
१ |
२ |
३ |
४ |
|
|
|
|
दिनांक : सक्षम प्राधिका-याची सही
ठिकाण : पदनाम
लासयनच्या अटी व शर्ती-
- (१) हे लायन लायसन दिलेल्या जागेत महत्वाच्या व ठळक जागी लावण्यात येईल,
- (२) लायसनधारक महाराष्ट्र फळांचे रोपमळे नियमन अधिनियम १९६९ आणि वेळोवेळी त्याचाखाली तयार करण्यात आलेले नियम यांच्या उपबंधाचे पालन करतील,
- (३) लायसनधारक ज्या फळांच्या रोपांच्या संबंधात महाराष्ट्र फळांचे रोपमळे नियमन अधिनियम १९६९ अन्वये लायसन देण्यात आलेला आहे त्या फळांच्या रोपव्यतिरिक्त इतर कोणतेही फळांची रोपे लायसन दिलेल्या जाबेत ठेवणार नाही,
- (४) लायसनधारक तो फळाच्या रोपांची ज्या ठिकाणी विक्री करीत असेल अशा जागेत कोणतेही बद्दल झाल्यास तो बद्दल वेळोवेळी सक्षम प्राधिका-यास कळवील,
नमुना 'क'
(नियम ४ पहा)
महाराष्ट्र फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियमन १९६९ अन्वये लायसनचे नवीकरण
करण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
सहायक कृषि संचालक
जिल्हा............................
............................ यास,
मी आम्ही ....................................................................................या
नावाने फळांच्या रोपांची पैदास व विक्री यांचा धंदा करण्यासाठी असलेल्या लायसनच्या नवीकरणसाठी याव्दारे अर्ज करीत आहे/अहोत मुळ लायसन सहायक कृषि संचालक जिल्हा................ यांनी क्रंमाक................ अन्वये परच वर्षाच्या कालावधीसाठी दिले होते व त्याची मुदत दिनांक ................................ला समाप्त होत आहे,
- (१) जनक रोपासह रोपमहयाचे एकुण क्षेत्र :
भूमापन क्रमांकासह जनक रोपांचा तपशील -
- (अ) भूमापन क्रमांक व क्षेत्र :
- (ब) जातीसह फळांच्या रोपांचा प्रकार :
- (क) फळांची रोपांची संख्या :
- (ड) फळांच्या रोपांचे वय जनक रोपांचा :
उगम, जनक रोपांचे उगमाविषयी माहिती उपलब्ध नसेल त्या बाबतीत त्या रोपांचे जनक रोपे म्हणुन वापर करण्यापुर्वीचे त्याचे उत्पन्न व फळाचा दर्जा,
(२) दरवर्षी त्या फळाचे पीक काढण्याची अर्जदाराची इच्छा आहे त्या प्रक्षेत्र फळाच्या पिकाच्या जातींच्या तपाशीलासह ग्राप्टेड, बडेड किंवा रुटेड कलमांची संख्या-
फळाचे नांव |
प्रकार |
पैदाशीची पद्धती |
पैदाशीच्या फळांच्या रोपांची संख्या |
१ |
२ |
३ |
४ |
|
|
|
|
- (३) कीटक कीड आणि वनस्पती रोग याच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेल्या सांधनांचा तपशील,
- (४) दरवर्षी तयार केलेल्या व चिक्री केलेल्या फळांच्या रोपांची संख्या प्रत्येक प्रकारासाठी वेगळी देण्यात यावी,
वर्ष |
फळाच्या रोपाचे नाव |
प्रकार |
तयार केलेल्या रोपांची संख्या |
विक्री केललीसंख्या |
विक्रीचा दर |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
|
|
|
|
|
|
- (५) लायसनच्या नवीकरणाची फी म्हणुन ................................ रुपये ................................ इतकी रक्कम यासोबत चेकने / मनिऑर्डरने रोख भरणा करण्यात येत आहे,
प्रतिज्ञापन
- (१) मी याव्दावारे प्रतिज्ञापन करतो की वर देण्यात आलेली माहिती माझ्या संपुर्ण माहिती नुसार व विश्वासानुसार खरी आहे,
- (२) मी अधिनियम आणि त्याखाली तयार करण्यात आलेले नियम वाचले असुन अधिनियमात आणि नियमात विहित करण्यात आलेल्या आधि अधिनियम व नियम यानुसार सक्षम प्राघिका-याकडुन विहित करण्यात येतील अशा सर्व अटी पुर्ण करण्याची हमी देत आहे,
- (३) मी केवळ दर्जेदार रोपे वाजवी किमतीने विकण्याची हमी देत आहे,
पत्ता : अर्जदाराची सही
ठिकाण :
नमुना 'क'
(नियम ६(अ) पहा)
फळांच्या रोपांची पैदास करण्यासाठी वापरण्यात आलेल्या जनक रोंपाचा उगम दर्शविणारी नोंदवही
ज्या फळांच्या रोपमळयातील रोपांच्या पैदाशीसाठी वापरण्यात येतात त्या फळांच्या रोपमळयाची जागा भूमापन क्रमांकासह |
फळझाडाचे नांव व प्रकार |
फळबागेत झाडाला नेमुन देण्यात आलेला क्रमांक |
मुलकांड रुटस्टाक |
कलम सायन |
मुलकांड |
कलम |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
|
|
|
|
|
नमुना 'क'
(नियम ६(ब) पहा)
पैदास करण्यात आलेली व विक्रीसाठी तयार असलेली फळांची रोपे दर्शविणारी नोंदवही
फळ झाडांचे नाव व प्रकार |
रोपमळयात जनक झाडाला नेमुन दिलेला क्रमांक |
पैदास केलल्या झांडाची संख्या |
रोपलावणी करीता विक्री साठी तयार असलेल्या फळांच्या रोपाची संख्या |
मुलकांड रुटस्टाक |
कलम सायन |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
|
|
|
|
|
नमुना 'क'
(नियम ६(क) पहा)
फळांच्या रोपांच्या विक्रीची नोंदवही
विक्रीची तारीख |
ज्या व्यक्तीला रोपे विकण्यात आलेली आहेत त्या व्यक्तीचे नाव व पत्ता |
विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या फळांच्या रोपाचा उगम |
ज्या दराने विक्री करण्यात आली तो दर |
शेरा |
नेमुन दिलेला मुलकांड क्रमांक |
नेमुन दिलेला मुलकांड कलम क्रमांक |
१ |
२ |
३ |
४ |
५ |
६ |
|
|
|
|
|
|
नमुना 'ग'
(नियम ९ पहा)
रोपमळयाचे नांव व पत्ता :
वय :
मुलकांड ( रुटस्टाक ):
कलम (सायन) :
नमुना 'ह'
(नियम ११(१) पहा)
सक्षम प्राधिका-याच्या निर्णयाविरुद्ध अपीलासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना
..................................................... या नावाने फळाच्या रोपाच्या उत्पादनाचा व विक्रीचा धंदा चालविण्यासाठी मला /आम्हाला दिलेल्या लायसन क्रमांक .............. चा धारक मी/आम्ही उक्त लायसन देण्यास किंवा रद्द करण्याच्या बंधातील .............. सक्षम प्राधिक-याचे पदनाम याच्या निर्णयाचा फेर विचार व्हावा म्हणुन याव्दारे अपील करीत आहे /आहोत, लायसन देणा-या प्राधिका-याने आदेश दिल्याची
तारीख व क्रमांक,
आमच्या वरील अपिलासाठीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :-
पत्ता :
दिनांक : अर्जदाराचे नाव