बियाणे हा घटक पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढीमध्ये महत्वाचा आहे. संशोधनानुसार असे निदर्शनास आलेले आहे की, केवळ बियाणे या घटकामुळे उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांची वाढ होते. पिकांच्या सुधारीत व संकरीत जाती विकसीत केल्यामुळे पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेमध्ये लक्षणिय वाढ होते. उदा. भात, ज्वारी, बाजरी, गहु, कापूस व भाजीपाला पिके इ.
- उद्देश
- निरनिराळ्या अन्नधान्य पिकांच्या सुधारलेल्या जातींचे उच्च प्रतीचे बियाणे शेतक-यांना सतत उपलब्ध व्हावे म्हणून तालुका बिज गुणन प्रक्षेत्रांची स्थापना करण्यात आली.
- बिज गुणन प्रक्षेत्रावर कृषि विद्यापीठातील पैदासकार बियाणे उत्पादन करण्यात येते.
- प्रक्षेत्रावर तयार झालेले पायाभूत/प्रमाणित/सत्यतादर्शक इ. बियाणे परीसरातील शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात येते.