कृषि विद्यापीठे व कृषि संशोधन संस्था यांचेकडील संशोधन महाराष्ट्र राज्यातील शेतक-यांना प्रगत कृषि तंत्रज्ञानाचा जलद गतीने व प्रभावीपणे प्रचार व प्रसार होण्यासाठी व त्याद्वारे शेतक-यांना त्या त्या भागातील प्रमुख पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषि विभागाच्या प्रक्षेत्रावर कृषि चिकित्सालय तथा शेतकरी प्रशिक्षण केंद्राची स्थापना सन 1997-98 मध्ये करण्यात आली आहे. राज्यात सद्यस्थितीत 231 कृषि चिकित्सालये आहेत.
- उद्देश
- कृषि विभागाच्या प्रक्षेत्रावर उपलब्ध सुविधाचा उपयोग करुन शेतक-यांना प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, आधुनिक कृषि तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिके आयोजित करुन प्रशिक्षण देणे, पिकांवरील कीड/रोग नमुन्याचे निदान व सल्ला देण्याची सुविधा, सुधारित पीक पद्धती, सुधारित सिंचन पद्धती, सुधारित मशागत पद्धत, जैविक खते व गांडूळ खतांचे उत्पादन, पीक संग्रहालय अंतर्गत विविध सुधारित पीक वाणांची ओळख, हरितगृह व शून्य उर्जा आधरित शितगृहाची उभारणी, बिजोत्पादन, कलमीकरण इ. बाबतची प्रात्यक्षिके, माहिती व मार्गदर्शन करण्यात येते.