डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे

डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे

शासनाचे दि.16 जुलै 2007 च्या शासन निर्णयान्वये कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या खाजगी जमिनीवर डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालण्याची कामे घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली आहे.

जागा निवडीचे निकष-

  • उपचार राबविण्यासाठी शेतक-यांची नियमानुसार लेखी संमती असणे आवश्यक आहे.
  • हा उपचार पाणलोट क्षेत्रांत राबविण्यांत यावा.
  • सलग समपातळी चराची कामे न झालेल्या क्षेत्रात सदरची योजना राबविण्यात यावी.
  • या योजनेकरीता डोंगर व टेकडयांच्या उतारावरील ज्या जमीनी वरकस व जास्त उताराच्या आहेत व मजगी किंवा सलग समपातळी चराची कामे करण्यास अयोग्य अशा जमिनी निवडण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी पुरेसा दगड उपलब्ध आहे अशा जागेची निवड करावी.
  • दगडांची बाहेरून वाहतूक करून बांध घालणे ही बाब या उपचारात अजिबात अभिप्रेत नाही.

तांञिक निकष -

या उपचारासाठी तांत्रिक मापदंडाचा तपशील पुढीलप्रमाणे राहील.

उतारगट तांत्रिक मापदंड

 

  पाया रूंदी मी. बांधाची उंची मी. माथा रूंदी मी. बाजू उतार बंाधाचा काटछेद(चौ.मी.) बांधाची लांबी मी.
10 टक्के पर्यंत 0.75 0.60 0.45 0.25:1 0.36 740
11 ते14 टक्के पर्यंत 0.75 0.60 0.45 0.25:1 0.36 800

 

14 टक्के पेक्षाजास्त 0.75 0.60 0.45 0.25:1 0.36 870

डोंगर उतारावर समपातळीत घालण्यात येणा-या दगडी बांधाचे संकल्पचित्र