केंद्र शासनाद्वारे विकसीत ई-गव्हर्नन्स प्रकल्प

 • डाक नेट (dacnet.nic.in): शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यास उपयुक्त अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही पोर्टल सुविधा विकसित केली असून त्यामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती व विविध संकेतस्थळांच्या उदा. योजना, आयात निर्यातीसाठी कीड रोग मुक्त रोपे/ बियाणे, निविष्ठा, यांत्रिकीकरण, हवामान अंदाज अहवाल इ. जोडण्या (links) उपलब्ध आहेत.
 • सिडनेट (seednet.gov.in) : या संकेतस्थळावर पीकनिहाय /वाणनिहाय पायाभूत, प्रमाणित, सत्यप्रत बियाणे माहिती उपलब्ध आहे.
 • अॅगमार्कनेट (agmarknet.nic.in) : या संकेतस्थळावर बाजारपेठनिहाय कृषि मालाची आवक व दर याबाबतची माहिती उपलब्ध आहे.
 • शेती व शेतकरी कल्याण मंत्रालय संकेतस्थळ (agricoop.nic.in)या संकेतस्थळावर केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजना व शेतीविषयक धोरणे याबाबतची माहिती उपलब्ध आहे.
 • फार्मर पोर्टल (www.farmer.gov.in) या पोर्टलवर शेतकरी समुदायासाठी उपरोक्त सर्व प्रकल्प व कृषि विभागातील इतर योजना एकाच ठिकाणी एकत्रितरित्या उपलब्ध केल्या आहेत. शेतकरी समुदायासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी हा या मागचा उद्देश आहे.
 • कृषि हवामान संकेतस्थळ (www.imdagrimet.gov.in) या संकेतस्थळावर हवामानाचा अंदाज, प्रत्यक्ष पडलेला पाऊस व त्याची सरासरीशी तुलना याबाबतची देश, हवामान विभाग, राज्य व जिल्हानिहाय माहिती व तपशीलदर्शक नकाशे उपलब्ध आहे.
 • राष्ट्रीय कृषि ई-गव्हर्नन्स प्रकल्प (NeGPA)
  • NeGPA अंतर्गत केंद्र व राज्य स्तरावरील शेतीविषयक विविध कार्यक्रम व सेवासुविधा एकत्रित करून केंद्रीय कृषि पोर्टल (CAP) व राज्य कृषि पोर्टल (SAP) मार्फत एकत्रितरीत्या उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. यामध्ये विविध माध्यमांचा वापर करुन निवडलेल्या १२ सेवा शेतकरी व भागधारक (Stakeholder) यांचेपर्यंत पोहचविल्या जाणार असून NIC कडून प्रत्येक सेवा उप-विभाग म्हणून विकसित केली जात आहे.
  • पहिल्या टप्प्यात यामध्ये महाराष्ट्र राज्यासह सात राज्यात संगणक सुविधा (संगणक प्रिंटर्स, स्कॅनर्स,kiosk, laptop इ. ) उपलब्ध करून दिले असून राज्यामध्ये ६२४ कार्यालयांमध्ये पुरवठा झाला आहे.
  • NeGPA अंतर्गत विविध माध्यमांचा वापर करुन निवडलेल्या १२ सेवाची माहिती खालीलप्रमाणे