जैविक कीटकनाशके प्रयोगशाळा

जैविक प्रयोगशाळा

अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी अधिक उत्पादन देणा-या व संकरीत जाती, रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके यांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात आला. त्यांच्या वापरामुळे उत्पादनात निश्चितच वाढ झाली परंतु रासायनिक खते व किटकनाशकांच्या सततच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे, पिकाची उत्पादकता कमी होणे, उत्पादित मालाची प्रत खालावणे, पाणी / वातावरणाचे प्रदूषण होऊन मानव व पशु पक्षी यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.

जैविक कीडनाशकांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात शासनामार्फत दहा जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. प. महाराष्ट्रात एक (अहमदनगर), मराठवाड्यात तीन (औरंगाबाद, परभणी व नांदेड), उत्तर महाराष्ट्रात दोन (जळगाव व धुळे) व विदर्भात चार (बुलडाणा, यवतमाळ, अमरावती व वर्धा) प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये बिव्हेरीया व व्हर्टिसिलीयम या चार जैवीक कीड व बुरशीनाशकांचे उत्पादन केले जाते. ही कीड व बुरशीनाशके शेतक-यांमध्ये लोकप्रीय असून त्यांचे विविध योजनेअंतर्गत वाटप व थेट विक्रीही केली जाते. या प्रयोगशाळांची कीड व बुरशीनाशके वार्षीक उत्पादन क्षमता 200 मे.टन असून प्रत्यक्ष वार्षीक उत्पादन मागणीनुसार 300 मे.टनांपर्यत घेतले आहे.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात जैविक खत वापरास प्राधान्य आहे. जैविक खताच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होवून उत्पादन खर्चात बचत होते. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखले जावून जैविक खताच्या वापरामुळे जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपिकता टिकून राहून पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेमध्ये वाढ होते.

जैविक खताचे महत्व लक्षात घेता खरीप 2016 पासून या प्रयोगशाळामध्ये जैविक खताचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. मागील वर्षी एक लाख लीटर वार्षिक उत्पादन करण्याचे प्रस्तावित होते. पण प्रत्यक्षात सन 2016-17 मध्ये द्रवरुप जैविक खताचे 1.74 लाख लिटर इतके उत्पादन घेण्यात आले असून सदर उत्पादनातून शासनास रू. 4.25 कोटी इतका महसूल जमा होईल.

पुढील तीन वर्षात सहा लाख लीटर उत्पादन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, अॅझोस्पीरीलम, अॅसिटोबॅक्टर यांचा समावेश असून त्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे, स्फुरद विरघळविणारे, पालाश विरघळविणारे व जस्त विरघळविणारे जिवाणू असतात. ही सर्व खते महारायझो, महाअॅझोटोबॅक्टर इ. महा ब्रॅण्ड मध्ये विक्री करण्यात येणार आहेत. ही खते महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पिके उदा. कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग, भुईमुग इत्यादी पिकांना उपयुक्त ठरणार आहे

द्रवरुप जिवाणूसंघ (Liquid Consortia) मध्ये यापैकी कमीत कमी दोन किंवा अधिक जिवाणूंचा समावेश असतो. एकच जिवाणू असणारे जैविक खत व दोन किंवा अधिक जिवाणू असणारे जिवाणूसंघ यांची तुलना केली असता द्रवरुप जिवाणूसंघ हा तुलनेने स्वस्त वापरण्यास सोपा, वाहतूक खर्च कमी, बीज प्रक्रीयेसाठी विशेष कौशल्याची आवश्यकता नसलेला एकात्मिक अन्नद्रव्य पुरविण्याचा उद्देश साध्य होणार आहे.

सन 2011-12 ते 2016-17 पर्यंत झालेले जैविक कीडनाशके उत्पादन आणि महसूल जमा याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अ.क्र वर्ष उत्पादन मे.टन( महसूल जमा रू. लाख
1 2011-12 208.22 141.28
2 2012-13 136.82 119.31
3 2013-14 290.46 231.06
4 2014-15 214.48 229.43
5 2015-16 174.45 161.13
6 2016-17 78.72 101.63
अ.क्र. प्रयोगशाळेचे ठिकाण स्थापना वर्ष वार्षिक उत्पादन क्षमता (मे. टन) पत्ता व दुरध्वनी क्रमांक ई-मेल आयडी
1 अहमदनगर 2007-08 20 सीडफार्म, सावेडी, अहमदनगर, दूरभाष क्र. - 9420748883 tobpclanagar@gmail.com
2 औरंगाबाद 2000-2001 25 शहाँनुरमियाँ दर्गारोड, कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर ज्योतीनगर, औरंगाबाद, दूरभाष क्र. - 9404693256 bclaurangabad@gmail.com
3 परभणी 2009-10 20 जिल्हा फळरोप वाटिका, परभणी, दूरभाष क्र. - 9421907890 bpclpbn@gmail.com
4 नांदेड 2009-10 24 वाघाळे पेट्रोल पंपासमोर, लातूर फाटयाजवळ, धनेगांव, नांदेड, दूरभाष क्र. - 9423140268 biolabnanded@gmail.com
5 धुळे 2005-06 20 पिंप्री , ता.वडजाई, जिल्हा धुळे, दूरभाष क्र. - 9421303567 biolabpimpri@gmail.com
6 जळगांव 2009-10 20 मुमराबाद, जिल्हा -जळगांव, दूरभाष क्र. -9527092149 jaiviklab@gmail.in
7 अमरावती 2004-05 25 कृषि अभियांत्रिकी कार्यशाळा परिसर, तपोवन रोड, अमरावती. दूरभाष क्र. - 8275068639 bclamt@rediffmail.com
8 यवतमाळ 2009-10 20 गार्डन रोड, यवतमाळ, दूरभाष क्र. – 9422938585/9423266229 bpclyavatmal@rediffmail.com
9 बुलढाणा 2005-06 25 बस स्टँडजवळ, बुलढाणा, दूरभाष क्र. - 9422941365 biolabbld@gmail.com
10 सेलू वर्धा 2004-05 20 सेलू, जिल्हा वर्धा, दूरभाष क्र.- 9423678904 bpclseloo@rediffmail.com